स्थळ अफगाणिस्तान… तालिबान सरकारच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक अफगाणिस्तानच्या राजधानीच्या बाहेरील भागात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांना टिपण्यासाठी जमले होते… हबीब रहमान इनकायद हा नेता ‘लक्ष्या’चे अचूक ‘लोकेशन’ मिळावे, यासाठी धावपळ करत होता. त्याने त्याच्या सहकाऱ्यांचा फोन घेऊन त्यांच्या वरिष्ठांना कॉल केला. या वरिष्ठांनी त्याच्या व्हॉट्सऍपवर ‘टार्गेट’ची लोकेशन पिनही पाठवली आहे. परंतु अमेरिकेच्या निर्बंधांमुळे व्हॉट्सअपने त्याचे खातेच बंद केल्यामुळे तो हतबल आहे. ‘आमचा संवाद साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हाट्सऍप — मात्र मी तो वापरू शकत नाही,’ असे २५ वर्षीय इन्कायाद सांगतो.
सन २०२१मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून न्यूयॉर्क टाइम्स त्याच्या मागावर आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, तालिबानी अधिकारी, पोलिस आणि सैनिक यांची व्हॉट्सऍपची खाती बंद तरी झाली आहेत किंवा तात्पुरती निष्क्रिय तरी झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत. मात्र याच संदेशवहन यंत्रणा तालिबान सरकारचा कसा कणा बनल्या आहेत, हेच या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे.
अमेरिकेने तालिबानींना खूप वर्षांपूर्वीच गुन्हेगारी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे तालिबानमधील व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी, तसेच त्यांची खाती पडताळण्यासाठी व्हॉट्सऍप मेसेजिंग ऍपवरील ग्रुपची नावे, वर्णन आणि प्रोफाइल फोटो तपासले जातात. दोन दशकांहून अधिक काळापूर्वी अमेरिकेचे निर्बंध लागू झाल्यापासून हे धोरण लागू करण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत, स्मार्टफोनचा वापर वाढल्याने आणि अफगाणिस्तानमध्ये फोरजी नेटवर्क सुधारल्यामुळे तालिबानींचे व्हॉट्सअॅपवरील अवलंबित्व वाढले आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्धाचा शेवट होऊन जसजशी तालिबानची पकड देशावर घट्ट होते आहे, तसतसे नोकरशाहीचे कामकाजही अधिक सुव्यवस्थित झाले आहे. त्यांच्या अधिकृत संवाद माध्यमांमध्ये व्हॉट्सऍप केंद्रस्थानी आहे. मात्र खाती बंद करण्याचा मांजरा-उंदराचा चाललेला खेळ तालिबान अधिकार्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. त्यांनी सरकार जरी स्थापन केले असले तरी जगाच्या पटलापासून मात्र ते दूरच आहे.
“आमचा इस्लामिक अमिरातीमध्ये ५० लोकांचा एक गट आहे आणि त्यातील ४० ते ४५ क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत,” असे तखार प्रांतातील पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. तरीही, ज्यांची खाती बंद झाली आहेत, अशा अनेकांना नवीन सिमकार्ड विकत घेण्याचा उपाय सापडला आहे. इन्कायादने अलीकडेच एक नवीन अमर्यादित डेटा प्लॅन खरेदी केला आहे ज्याची किंमत महिन्याला ७०० अफगाणी आहे, म्हणजेच सुमारे आठ अमेरिकी डॉलर. त्याच्या ‘बजेट’साठी हे महाग आहे, मात्र तरीही ऍपसाठी ते गरजेचे आहे. “माझे संपूर्ण आयुष्य माझ्या व्हॉट्सऍपवर अवलंबून आहे,’ असे तो सांगतो.