24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनिया'तांत्रिक बिघाडामुळेच पाकिस्तानमध्ये मिसाईल घुसली'

‘तांत्रिक बिघाडामुळेच पाकिस्तानमध्ये मिसाईल घुसली’

Google News Follow

Related

भारतीय हद्दीतून अलीकडेच चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भारताने या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, नियमित देखभाल करताना तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे म्हटले होते.

या घटनेबाबत माहिती देताना आज राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत की, “९ मार्च २०२२ रोजी घडलेल्या एका घटनेबद्दल मला सभागृहाला अवगत करून द्यायचे आहे. ही घटना तपासणीदरम्यान अनावधानाने क्षेपणास्त्र सोडण्याशी संबंधित आहे. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि तपासणी सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती मिळाली. ही घटना खेदजनक आहे. मात्र या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे,” अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली.

“मला सभागृहाला कळवायचे आहे की, सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण काय होते, हे तपासानंतर कळेल.” ते पुढे हे ही म्हणाले की, “या घटनेच्या संदर्भात ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचा आढावा घेतला जात आहे. आम्ही आमच्या शस्त्र यंत्रणेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो आणि यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास त्या तात्काळ दुरुस्त करण्यात येतील. आपली सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल उच्च दर्जाचे आहेत आणि वेळोवेळी याची तपासणी केली जाते. आपले सुरक्षा दल प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना अशा यंत्रणा हाताळण्याचा चांगला अनुभव आहे.”

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

‘या’ कारणासाठी मालदीवने मानले भारताचे आभार!

डेरवण युथ गेम्स : ‘अपयशातूनच होते यशाची निर्मिती’

पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’

या घटनेनंतर अमेरिकेने भारताची बाजू घेतली असून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “भारताकडून क्षेपणास्त्र डागणे हा केवळ एक अपघात होता. आम्ही यावर अधिक भाष्य करू शकत नाही.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा