अमेरिकेतील ह्युसन विद्यापीठात शिकणारी २५ वर्षीय भारतीय वंशाची विद्यार्थिनी कोमात असून सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे.
ह्युस्टन विद्यापीठात शिकणारी सुसरुन्या कोडुरू ४ जुलै रोजी जैंकिटो स्मारक उद्यानातील तलावात आपल्या मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर ती तलावात कोसळली आणि तिला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत होऊन ती सध्या कोमामध्ये आहे, अशी माहिती तिचा चुलतभाऊ सुरेंद्र कुमार याने दिली.
सुसरुन्या हिला दीर्घ उपचाराची गरज असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी तिच्या कुटुंबीयांनी GoFundme नावाचा मदतनिधी उभारला आहे. सध्या या विद्यार्थिनीचे आई-वडील भारतातच असून तिथे लवकरात लवकर पोहोचून मुलीसोबत राहण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा:
वकार यूनुसची दर्पोक्ती; पाक म्हणे भारताला जगात कुठेही हरवू शकतो
भारतीयांना आता ५७ देशांत व्हिसाशिवाय परवानगी; सिंगापूर अव्वल
जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !
मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ
ह्युस्टन विद्यापीठात प्रौद्योगिक विभागात मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी कोडुरी येथे आली होती. हा अभ्यासक्रम तिने जवळपास पूर्ण केला होता. त्यानंतर ती इंटर्नशिप मिळण्याची वाट पाहात होती. २ जुलै रोजी ती सॅन जैसिंटो स्मारकात गेली होती आणि वीज कोसळल्यामुळे तलावाच्या जवळ जखमी झाली होती. त्यानंतर तिला २० मिनिटे हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत होऊन ती कोमात गेली.