भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, १५ जुलै रोजी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला रवाना झाले. फ्रान्स वरील दोन दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी युएईला रवाना झाला. या दौऱ्यात ते यूएईचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे युएईमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळख असलेल्या बुर्ज खलिफा ही इमारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उजळून निघाली होती. बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि स्वागतासाठी खास संदेश झळकला. दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली होती. बुर्ज खलिफावर त्यांच्या फोटोसह ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत आहे’ असं लिहिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या एक दिवसीय दौऱ्यावर आज अबुधाबी येथे पोहोचले आहेत.
WATCH | Dubai's Burj Khalifa displayed the colours of the Indian national flag yesterday ahead of PM Modi's official visit to the country pic.twitter.com/xQ9e7cJ6uH
— ANI (@ANI) July 15, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी युएईमध्ये पोहचले. त्यानंतर ४.४५ वाजता ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा एक दिवसीय दौरा आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ व्हावेत असा या दौऱ्याचा उद्देश आहे.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार
कॅनडामधील भगवत गीता पार्कमध्ये फुटीरवाद्यांकडून तोडफोड
चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!
त्यापूर्वी नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडला उपस्थिती दर्शवली. या दौऱ्यामध्ये त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा देखील केली. नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ दि लीजन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.