पाकिस्तानच्या विद्यापीठात अंमली पदार्थ, लैंगिक शोषण आणि अश्लिल व्हीडिओ

पोलिसांना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइल फोनवर काही अश्लील व्हिडीओही सापडले

पाकिस्तानच्या विद्यापीठात अंमली पदार्थ, लैंगिक शोषण आणि अश्लिल व्हीडिओ

पाकिस्तानमधील बहवालपूर इस्लामिया विद्यापीठात अमली पदार्थांची विक्री केली जात असून तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप पोलिसांच्या अहवालात करण्यात आला आहे. या विशेष अहवालानंतर या विद्यापीठाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

पोलिसांना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइल फोनवर काही अश्लील व्हिडीओही सापडले आहेत. पोलिसांनी विद्यापीठाच्या खजिनदाराला अटक केली असून त्याच्याकडून कामोत्तेजक पदार्थ जप्त केले आहेत, तर विद्यापीठाच्या सुरक्षा प्रमुखावर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवल्याचा आरोप आहे.

 

तपासात अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाइल फोनमधून अनेक पुरावे उघडकीस आले आहेत, ज्यात अनेक व्हॉट्सऍप चॅट्स आणि व्हिडिओंचा समावेश आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, अमली पदार्थांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण केले.

 

डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, विद्यापीठाच्या खजिनदार इतर शिक्षकांच्या गटासह विद्यार्थ्यांमार्फत अमली पदार्थ खरेदी करून ते वितरित करणार होता, तसेच, नृत्य/सेक्स पार्टी आयोजित करणार होता, अशी कबुली त्याने दिली आहे . शिक्षकांचा एक गट मुलींचे शोषण करेल आणि त्यांना धमकावून तसेच, अमली पदार्थ देऊन त्यांना अडकवेल, अशी भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

विद्यापीठाच्या खजिनदाराच्या अटकेदरम्यान, त्याच्याकडे १० ग्रॅम चरस सापडले. शिवाय, त्याच्या मोबाइल फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ होते. यानंतर, कॉलेजचा सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारा निवृत्त मेजर, एजाज हुसेन यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून हा बेकायदा व्यापार सुरू असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीच्या मुलींना लक्ष्य करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा:

ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे

दोन व्यापाऱ्यांची हत्या; मृतदेह जाळून वर्धा नदीत टाकले

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा अंतरिम जामीन मंजूर

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दुप्पट मदत

विद्यापीठाचा दावा काय?

पोलिसांच्या कारवाईनंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. डॉ. अथर मेहबूब यांनी पोलिस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर यांना पत्र लिहून, या अटकेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी पथक स्थापन करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांवरील खटले ‘बोगस’ आहेत, असा दावा विद्यापीठाने केला आहे.

चौकशीचे आदेश

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने इस्लामिया विद्यापीठाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये तीन कुलगुरू आणि सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आणि उपलब्ध डिजिटल किंवा भौतिक पुरावे, साक्ष आणि इतर संबंधित पुरावे तपासण्याचे काम देण्यात आले आहे, असे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे.

Exit mobile version