लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गट आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही बाजूने सातत्याने हल्ले सुरू आहेत. दुसरीकडे इस्रायल विरुद्ध हमास असा संघर्षही सुरू आहे. अशातच हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला. त्याला टिपल्यानंतर आता इस्रायलमध्ये एका ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा स्फोट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खासगी निवासस्थानाजवळ हा स्फोट झाला यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
लेबनॉनमधून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या दक्षिण हैफामधील सीझरिया येथील खाजगी निवासस्थानाजवळ स्फोट झाला. रॉयटर्सने यासंदभार्त वृत्त दिले आहे. पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने सांगितले की, हल्ल्याच्या वेळी नेतन्याहू उपस्थित नव्हते. इस्रायलने गाझामध्ये हमास प्रमुख याह्या सिनवारला टिपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनंतर हा स्फोट झाला. त्यामुळे हा बदला घेण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा..
शुटरच्या फोनमध्ये झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला
…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन
ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य
विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी
इस्रायलची सुरक्षा यंत्रणा या ड्रोनला रोखू न शकल्याने आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, तीन ड्रोन लेबनॉनपासून हैफापर्यंत पोहोचले. यातील दोन ड्रोनचा शोध घेऊन त्यांना रोखण्यात यश आले. मात्र, तिसरा ड्रोन सीझरियातील एका इमारतीला अचूक जाऊन धडकला. प्रत्यक्षदर्शी लोकांनी पुष्टी केली की स्फोट मोठा होता.