रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ड्रोन हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावले आहेत. राष्ट्रपती पुतीन यांना मारण्यासाठी युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हा हल्ला रशियन सैन्याने हाणून पाडला असून युक्रेनचे ड्रोन पाडण्यात आले असल्याचा दावा रशियाने केला आहे. आता क्रेमलिनने युक्रेनला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. यामध्ये राष्ट्रपतींचे कोणतेही नुकसान झाले नाही. पुतिन पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्या कामाच्या वेळापत्रकातही कोणताही बदल झालेला नाही. असे पुतीन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी रशियाने पुतीन यांच्यावर हायटेक ड्रोनने हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती.
हा ड्रोन हल्ला झाला तेव्हा पुतिन क्रेमलिनमध्ये उपस्थित नव्हते. हल्ल्यात ड्रोनचा वापर करण्यात आला. सध्या राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मॉस्को येथील शासकीय निवासस्थानी उपस्थित असून तेथून ते काम करत आहेत असे पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?
‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना मोफत तिकीट देणार
वृद्ध पद्म पुरस्कारविजेत्या महिलांनी पंतप्रधानांचे केले अनोखे कौतुक
मुंबईचे डबेवाले ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सला देणार पुणेरी पगडीचा मान
रशियामध्ये दरवर्षी ९ मे रोजी विजय दिवस परेड होते. त्या आधीच हा हल्ला झाला आहे. परंतु पेस्कोव्ह म्हणाले आम्ही अशा कृत्यांना घाबरणार नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की विजय दिन परेड देखील वेळापत्रकानुसार आयोजित केली जाईल.
क्रेमलिनवर हल्ला करण्यासाठी २ ड्रोन वापरण्यात आले होते. रशियाने त्यांच्या रडार आणि ट्रैकिंग सिस्टीमने त्यांचा शोध घेतला. आता रशिया याला आपल्या शैलीत उत्तर देऊ. आम्ही याकडे नियोजित दहशतवादी हल्ला म्हणून पाहत आहोत. त्याला योग्य उत्तर दिले जाईल असे रशियाने म्हटले आहे.