युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

मॉस्को येथील शासकिय इमारतींवर ड्रोनने हल्ला

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये अद्याप युद्ध सुरू आहे. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना युक्रेन चोख प्रत्युत्तर देत आहे.

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये मागील काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. यावर युक्रेनने रशियाच्या राजधानीच्या शहरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनकडून रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकिय इमारतींवर शनिवारी रात्री ड्रोनने हल्ला करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाची राजधानी मॉस्कोमधील सरकारी इमारतीला युक्रेनकडून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. आयक्यू क्वार्टर नावाच्या या इमारतीत सरकारी कर्मचारी वास्तव्यास असतात. युक्रेनकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात कोणीही जखमी अथवा मृत झाले नसल्याचे राजधानी मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

५०० वृक्ष तोडणाऱ्या बिल्डरला झाकणारा तो मोठा नेता कोण?

अंजू झाली आता पाकिस्तानी, परतणे कठीण

सीबीआयकडून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एफआयआर

मॉस्कोवर शनिवारी रात्रीच्या वेळी युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन कार्यालयांचे नुकसान झाले असून शहरातील दोन कार्यालयांच्या टॉवरच्या काही भागाचे किंचित नुकसान झाले आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएफपी न्यूज एजन्सीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version