रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजून शमलेलं नाही दोन्हीकडून सातत्याने हल्ले होत असून शनिवार, २१ डिसेंबर रोजी रशियातील कझान शहरावर मोठा ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. कझानमधील उंच इमारतींना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनियन ड्रोनने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण ९/११ हल्ल्याची आठवण जगाला करून देणारा हल्ला रशियातील कझान शहरात झाला आहे. रशियातील कझान शहरात सीरियल ड्रोन (यूएव्ही) हल्ले करण्यात आले आहेत. शहरातील तीन उंच इमारतींमध्ये हे हल्ले झाले. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर, एक ड्रोन निकामी केल्याचे रशियाचे म्हणणे आहे.
BREAKING | 9/11-style attack in Kazan, Russia
Ukrainian drone crashes into a multi-story building. #UkraineRussiaWar #RussiaUkraineWar pic.twitter.com/NlhjdK5a5d
— Organiser Weekly (@eOrganiser) December 21, 2024
कझानमधील उंच इमारतींवर झालेल्या हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे ड्रोन इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही होताना दिसत आहे. या हल्ल्याचा थेट आरोप रशियाने युक्रेनवर केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे म्हटले आहे.
रशियातून समोर आलेल्या माहितीवरून या इमारतींमध्ये रहिवासी राहत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावरही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
हे ही वाचा :
संजय राऊत यांची रेकी करणारे निघाले, मोबाईल कंपनीचे कर्मचारी!
“मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात रेकीची गरज नाही”
मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?
रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने कझान शहरावरील युक्रेनचे ड्रोन नष्ट केले आहे. त्याचवेळी, रशियन मीडिया एजन्सी स्पुतनिकला कझानच्या महापौर कार्यालयातून सांगण्यात आले आहे की, ड्रोन हल्ल्यामुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की या तीन जिल्ह्यांमध्ये काही घरांना आग लागली आहे. ड्रोन हल्ल्यामुळे ज्या इमारतींना आग लागली तेथे बचाव कार्य सुरू आहे. आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना राहण्यासाठी अन्न आणि निवारा दिला जात आहे.