डीआरडीओची ‘आकाशा’ला गवसणी

डीआरडीओची ‘आकाशा’ला गवसणी

डिफेन्स रिसर्च एँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) नुकतंच अत्याधुनिक अशा जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेतली. हे नवे घातक क्षेपणास्त्र भारतीय हवाई सेनेसाठी आकाशातील धोके दूर करण्यासाठी तयार केले असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल डीआरडीओच्या सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

या क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या वेळेस तेथे डीआरडीओ, बीडीएल (भारत डायनामिक्स लिमिटेड) आणि बीइएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबरोबरच भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार आकाश आपला लक्ष्यभेद अचूकतेने करण्यात यशस्वी ठरले होते. या क्षेपणास्त्रात वापरलेली नियंत्रण उपकरणे आदी उपकरणे देखील उत्तमरितीने कार्यरत असल्याची माहिती या संस्थेकडून प्राप्त झाली आहे.

या चाचणीच्या वेळेस विविध पल्ल्यांच्या उपकरणांसह इओटीएस आणि इतर आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला होता. बहु-आयामी रडारचा वापर करून या सर्व उपकरणांचा आणि प्रणालींचा एकमेंकाशी असलेला ताळमेळ ताडून पाहण्यात आला.

आकाश क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती यावेळी तपासून पाहण्यात आली. हे क्षेपणास्त्र इतर प्रणालींच्या तुलनेत कुठेही तैनात केलं जाऊ शकतं ही या क्षेपणास्त्राची खासियत आहे.

Exit mobile version