महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रूट किंवा कमलम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फळाची दुबई येथे निर्यात करण्यात आली आहेत. भारत सरकारच्या ‘अपेडा’ अर्थात खाद्य पदार्थ निर्यात करणाऱ्या विभागातर्फे या फळांची निर्यात करण्यात आली आहे. या फळांचे उत्पादन महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तडसर या गावी झाले आहे. या ड्रॅगन फ्रूटला परदेशात मोठी मागणी आहे.
१९९० सालच्या सुरवातीच्या कालखंडात ड्रॅगन फ्रूटच्या भारतातील निर्मितीला सुरुवात झाली. अल्पावधीतच हे फळ देशभर लोकप्रिय झाले. खास करून तरुणाईमध्ये या फळाची खूप जास्त मागणी असल्याचे दिसून येते. भारतात महाराष्ट्रा व्यतिरिक्त कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तथा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन केले जाते.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री महाराष्ट्राला ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहातायत!
कुंदन, पालांडे यांनी बारमालक, बदल्यांसाठी कोट्यवधी उकळले
तिसरी लाट तोंडावर; पण ठाकरे सरकार गाफील
ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे षडयंत्र
या फळाच्या उत्पादनाला कमी पाणी आणि विविध प्रकारची माती उपयुक्त ठरते. या फळात फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे हे फळ खूपच पौष्टिक समजले जाते. परदेशातली या फळाची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनाही या उत्पादनातून चांगला लाभ होतो
या फळाला परदेशातही चांगली मागणी असून भारता व्यतिरिक्त मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन होते.