कोरोना ऍक्शन फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांचा सन्मान

कोरोना ऍक्शन फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांचा सन्मान

मधुमेह तज्ज्ञ आणि कोरोना ऍक्शन फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दिल्ली येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार IMA द्वारे दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांना दिला जातो. बक्षीस, प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ.जोशी यांनी कोरोना कालावधीत कोरोना ऍक्शन फोर्सच्या माध्यमातून राज्यभरातील डॉक्टरांना या नवीन आजाराच्या उपचाराची दिशा दाखवली. विविध कार्यक्रमांद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कोरोना वॉरियर्ससाठी आहे

कोरोनाचे निदान झाले तेव्हा हा रोग पूर्णपणे नवीन होता. तथापि, कोरोना वॉरियर्सने अथक परिश्रम घेतले. या कोरोना योद्ध्यांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. शशांक जोशी म्हणाले. कोरोनामध्ये जोशी यांचे योगदान हे फार मोलाचे होते. त्यांनी अहोरात्र या काळात खूप मेहनत घेतली होती.

मुख्य बाब म्हणजे मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमातूनही मोदींनी जोशी यांच्याशी संवाद साधला होता. पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी संवाद साधला होता. त्याचवेळी त्यांनी डॉ. शशांक जोशी यांच्याशी बातचीत केली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्या विचारातील स्पष्टता मला आवडली. आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं. कोरोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी?,’ असा प्रश्न मोदींनी विचारला होता.

हे ही वाचा:

नितीन गडकरींच्या व्हीडिओंना मिळत आहे इतकी रक्कम

पेन्शन योजनेतील ग्राहकांच्या संख्येत होतेय वाढ

महापालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या रस्तेकामांच्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवा!

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी करोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोकं घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो,” असं शशांक जोशी म्हणाले होते.

Exit mobile version