भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरी गाठणारी दीपिका ही भारताची पहिली तिरंदाज ठरली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीतील पराभवामुळे तिचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भंगले होते. ऑलिम्पिकमधील खेळाचे दडपण न बाळगता, अपेक्षित यशासाठी इतक्या मोठ्या पातळीवरील खेळाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे, असे दीपिका कुमारी हिने सोमवारी एका मुलाखतीत सांगितले.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ‘ऑलिम्पिकच्या त्या पाच वर्तुळांचे’ दडपण अधिक असते असे दीपिका कुमारी हिने मुलाखतीत म्हटले. आम्ही फक्त पदकांच्या मागे धावतोय, पण तेव्हा त्या खेळातील क्षणांचा आनंद घ्यायला कमी पडतोय असेही वक्तव्य तिने केले. भारताकडे पदके नाहीत असे सर्वजण बोलत होते. आम्हीही तिथे तोच विचार करत होतो आणि त्याचा परिणाम आमच्या मानसिकतेवर होत होता शिवाय खेळावरही दिसून येत होता. सर्व पातळीवरील खेळांच्या स्पर्धांना समानतेने पाहणे आवश्यक आहे. पदकाला खूप महत्त्व दिले जाते. खेळातला आनंद घ्यायला हवा.
हे ही वाचा:
सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी
किल्ल्यांच्या संवर्धनापेक्षा महसुलाच्या ‘किल्ल्यां’कडे लक्ष?
महारेराच्या काळ्या यादीत राज्यातील १ हजार १८० प्रकल्प
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी आता टीशर्ट घाला
विश्व अजिंक्यपद आणि विश्व चषक या स्पर्धांमध्येही पदक मिळवणे हेच अंतिम ध्येय असले तरी आम्ही त्याचा सतत विचार करत नसतो. पण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मात्र डोक्यात सतत पदकासंबंधीचे विचार असतात आणि ते दडपण कमी करण्यासाठी त्यावर काम करण्याची जास्त आवश्यकता आहे असे दीपिकाने मुलाखतीत म्हटले आहे.