25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनिया‘गाझा ताब्यात घेऊ नका’ : अमेरिकेचा इस्रायलला इशारा

‘गाझा ताब्यात घेऊ नका’ : अमेरिकेचा इस्रायलला इशारा

Google News Follow

Related

इस्रायलने गाझा पट्टीमध्ये जमिनीवरून आक्रमणाची तयारी केली असतानाच अमेरिकेने मात्र इस्रायलला असे न करण्याचा इशारा दिला आरे. तसेच, लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलला सांत्वनपर भेट देणार असल्याचे समजते.
हमास या दहशतवादी गटाने इस्रायलवर केलेल्या नृशंस हल्ल्यात १४०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २९ अमेरिकी नागरिक आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र इस्रायल आता गाझा पट्टीमध्ये जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली असून अमेरिकेनेही गाझा पट्टी संपूर्णपणे ताब्यात घेण्यास विरोध केला आहे.

‘ही खूप मोठी चूक ठरेल. गाझामध्ये जे काही घडले त्यामागे माझ्या मते हमासचा हात होता आणि हमासचे कट्टरपंथी हे सर्व पॅलेस्टाइन नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. त्यामुळे इस्रायलने गाझापट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवणे ही इस्रायलची खूप मोठी चूक ठरेल,’ असे बायडेन यांनी एका टीव्ही मुलाखतीत स्पष्ट केले.

असे असले तरी त्या भागातून कट्टरवाद्यांना बाहेर काढणेही तितकेच गरजेचे आहे, यावरही त्यांनी जोर दिला. तसेच, युद्धाच्या नितीनियमांनुसारच इस्रायल वागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्य काही दिवसांत बायडेन इस्रायलला भेट देणार असल्याचे बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले

रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण

उत्तर गाझातून बाहेर पडण्यासाठी इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना दिलेली तीन तासांची अंतिम मुदत रविवारी दुपारी एक वाजता संपली. त्यानंतर इस्रायली संरक्षण दल (आयडीएफ) गाझा पट्टीत जमिनीवरील हल्ल्यासाठी सरकारच्या हिरव्या कंदिलाची वाट पाहात आहे. त्यामुळे इस्रायलकडून गाझा पट्टीत कोणत्याही क्षणी जमिनीवरील हल्ला होऊ शकतो. इस्रायलने रणगाडे आणि शस्त्रे गाझाच्या सीमेवर आणून ठेवली आहेत. त्यामुळे आकाश, समुद्र आणि जमीन अशा तिन्ही मार्गाने युद्ध करण्याचे संकेत इस्रायलने दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा