अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. एलन मस्क यांनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे . ट्विटरवरील लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे .
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट लवकरच रिस्टोअर केले जाईल असे ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी सांगितले होते. गेल्या वर्षी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंटवर निर्बंध घालण्यात आले होते.
ट्रम्प यांचे खाते सुरु करावे की नाही याबाबत मस्क यांनी १९ नोव्हेंबर रोजी युजर्सना त्यांचे मत विचारले होते. यावर, ५१.८ टक्के वापरकर्त्यांनी खाते रिस्टोअर करण्याच्या बाजूने मतदान केले. या मतदानात एकूण १,५०,८५,४५८ लोकांनी भाग घेतला. १३५ दशलक्षाहून अधिक लोकांनी मतदान केले .ट्विटर विकत घेण्यापूर्वी, मस्कने ट्रम्पसह अनेक खात्यांवर लादलेल्या निर्बंधांना मूर्खपणाची वृत्ती असल्याचे सांगितले होते.
हे ही वाचा :
सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट वादग्रस्त ट्विटमुळे ब्लॉक करण्यात आले होते. अमेरिकेत झालेल्या निवडणुकीनंतर जो बायडेन अध्यक्षपदासाठी निवडून आले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि आत गोंधळ घातला. जमावाची हिंसक निदर्शने पाहता ट्विटरने प्रथम ट्रम्प यांचे खाते १२ तासांसाठी आणि नंतर पूर्णपणे निलंबित केले होते .