अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या रिपब्लिकन पक्षात झालेल्या आयोवा कॉकसच्या पहिल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. त्यामुळे रिपब्लिक पक्षाकडून अध्यक्षीय उमेदवारी म्हणून त्यांची दावेदारी पक्की समजली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ उमेदवार आहेत. आयोवा कॉकसच्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयामुळे ट्रम्प हे पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सध्या अमेरिकेच्या न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाले आहे. कायदेशीर लढाईमुळे त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात होतं. पण, आयोवाच्या विजयाने दाखवून दिलंय की त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा अद्याप कायम आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.
Former US President Donald Trump wins the Republican caucus on Monday (15th January) night in Iowa, the lead-off contest in the 2024 Republican presidential nominating calendar.
(File photo) pic.twitter.com/m8FzPs3yNb
— ANI (@ANI) January 16, 2024
आयोवा कॉकसच्या सुरुवातीच्या निकलांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती. त्यांना सुरुवातीला एक तृतियांश मते मिळाली होती. त्यामुळे पुढील मतमोजणी औपचारिकता ठरली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना पर्याय म्हणून फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसेटिस आणि माजी यूएन अॅम्बेसेडर निक्की हेले ही समोर होते. पण, ट्रम्प सध्यातरी त्यांच्यावर मात करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…
अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!
पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’
डोनाल्ड ट्रम्प हे बायडेन यांना थेट टक्कर देण्याचीच दाट शक्यता आहे. जो बायडेन यांची लोकप्रियता घटली आहे. हे डेमोक्रेटमधील नेते देखील मान्य करु लागले आहेत. जो बायडेन यांचे वय झाल्याने ते अध्यक्षपद सांभाळण्यास सक्षम राहिले नाहीत असा मुद्दा पुढे केला जात आहे. याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना होण्याची शक्यता आहे.