…अन् तान्हुलीला विमानातच भेटले देवदूत

विमानाने बेंगळुरूतून उड्डाण केल्याला अर्धा तास होत नाही तोच वैद्यकीय आणीबाणीची सूचना मिळाली

…अन् तान्हुलीला विमानातच भेटले देवदूत

एखाद्या व्यक्तीची संकटातून सुटका करायचीच असेल तर, त्याला देवदूत कुठेही भेटू शकतो. असेच काहीसे रविवारी बेंगळुरू-दिल्ली या विस्तारा कंपनीच्या विमानात झाले. या विमानातील एका दीड वर्षांच्या मुलीचा श्वासोच्छवास मध्येच बंद पडला होता. मात्र एका वैद्यकीय परिषदेतून परतणारे आणि त्याच विमानातून प्रवास करणारे पाच डॉक्टर तिच्या मदतीसाठी देवदूतासारखे धावून आले.

 

विमानाने बेंगळुरूतून उड्डाण केल्याला अर्धा तास होत नाही तोच विमानातील कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय आणीबाणी आल्याचे विमानात जाहीर केले. लगेचच विमानात असलेले ‘एम्स’चे चार डॉक्टर आणि यकृत व पित्तविषयक विज्ञान संस्थेच्या एका डॉक्टरने त्यांना प्रतिसाद दिला. बेंगळुरूमधील इंडियन सोसायटी व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीच्या दोन दिवसांच्या परिषदेत सहभागी होऊन हे डॉक्टर घरी परतत होते.

 

 

‘या मुलीला जन्मजात हृदयरोग होता. तीन आठवड्यांपूर्वीच तिच्यावर बेंगळुरूमध्ये ओपन इंट्राकार्डियाक रिपेअर सर्जरी झाली होती. मात्र विमानात अचानक तिने श्वास घेणे थांबवले. तिच्या नाडीचे ठोकेही वाजत नव्हते आणि हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत नव्हते. त्यामुळे तिच्यावर सीपीआर करण्यात आला,’ अशी माहिती रेडिओलॉजी आणि एंडोव्हस्कुलर इंटरव्हेन्शन्सचे निवासी डॉक्टर वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दमनदीप सिंग यांनी दिली. त्यावेळी मूल सायनोटिक असल्याचे आढळले (रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचेचा निळसर रंग होतो),’ असे डॉ. सिंग यांनी सांगितले.

 

मुलीचा श्वसनमार्ग तीन मार्गांनी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तिचे डोके तिरपे करण्यात आले. जबडा उघडण्यात आला आणि हनुवटीही वरच उचलली गेली. तसेच, ज्येष्ठ व्यक्तींचा मास्क ऍम्बु बॅगला लावून दाब देऊन वायूवीजन सुरू करण्यात आले. तसेच, छातीवर दाब देण्यात आले. ऑक्सिजन सिलिंडरला ऍम्बू बॅगशी जोडण्यासाठी, ऑन-बोर्ड आपत्कालीन ऑक्सिजन मास्कमधून आवश्यक ट्यूबिंग काढण्यात आली.

हे ही वाचा:

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ

काँग्रेसचा शिवशक्तीला विरोध का?

 

कठीण परिस्थितीत, आवश्यक घटकांच्या मर्यादित उपलब्धता असूनही पहिल्याच प्रयत्नात आयव्ही लाइन सुरक्षित करण्यात आली आणि प्रत्येक तीन ते पाच मिनिटांनी बाळाच्या वजनानुसार आणीबाणीची औषधे (प्रामुख्याने अॅड्रेनालाईन) दिली गेली. सीपीआर चालू असतानाही ‘कार्डियाक शॉक’ देण्यासाठी बोर्डवर उपलब्ध स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटरचा वापर करण्यात आला.

 

‘ ४५ मिनिटे सीपीआर दिल्यानंतर तिच्या छातीचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले,’ अशी माहिती डॉ. दमनदीप यांनी दिली. हृदयाच्या गतीचे निरीक्षण करण्यासाठी कोणतेही ईसीजी मशिन उपलब्ध नसल्यामुळे वैमानिकाला ताबडतोब जवळच्या विमानतळावर विमान उतरण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे २० मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या नागपूर विमानतळावर हे विमान रात्री साडेदहाच्या सुमारास उतरले. अन् या मुलीला रुग्णवाहिकेत सज्ज असलेल्या बालरोगतज्ज्ञांकडे सुपूर्द करण्यात आले. डॉ. नवदीप कौर, डॉ. ओशिका चक्रवर्ती, डॉ. अवचला तक्सक, डॉ. दमनदीप सिंग आणि डॉ. ऋषभ जैन हे विमानातील डॉक्टर या मुलीसाठी देवदूत ठरले.

Exit mobile version