…म्हणून डॉक्टरांनी एका दिवसात केले ६७ गर्भपात!

…म्हणून डॉक्टरांनी एका दिवसात केले ६७ गर्भपात!

डॉ. जसबीर अहलूवालिया यांनी ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत ६७ महिलांचे गर्भपात केले. टेक्सासमध्ये नवा गर्भपात कायदा लागू होण्यापूर्वी ८३ वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी टेक्सास मधील त्यांच्या दवाखान्यात सकाळी ८ वाजल्यापासून त्यांचे काम सुरू करून मध्यरात्रीपासून ६७ महिलांचे गर्भपात केले. गर्भपात केलेल्या प्रकरणांमध्ये काही गुंतागुंतीचीही प्रकरणे होती. त्यांनी रात्री शेवटचा गर्भपात ११.५० ला केला. त्यात शेवटची रुग्ण ही एक परिचारिका होती आणि ती आठ आठवड्यांची गर्भवती होती.

टेक्सासमधील कायद्यानुसार, गर्भधारणेच्या सहा आठवड्यानंतर जर एखाद्या महिलेचा गर्भपात झाला, तर तो गुन्हा मानला जाईल. यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, अशा कोणत्याही घटनेची बातमी मिळताच कोणताही नागरिक आरोपी महिला आणि गर्भपात करणार्‍या दवाखाने आणि परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करू शकेल.

हे ही वाचा:

बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

धक्कादायक! … स्मशानभूमीत सुरू होती अल्पवयीन मुलीची पूजा

मदतीसाठी तत्पर अग्निशमन दलाच्या ‘फायर बाईक’

कायदा लागू झाल्यानंतर अहलूवालिया यांच्या दवाखान्यातील गर्भपात करायला येणाऱ्या महिलांची संख्याही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कायद्याविषयी बोलताना अहलूवालिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तालिबान्यांशीही त्यांनी तुलना करून नाराजी दर्शवली आहे. पुरुषांवर परिणाम होईल असा कोणताही कायदा नाही, सर्व बंधने महिलांसाठीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीही अशा गर्भपात बंदीच्या परिणामांना सामोरे जावे लागले आहे. युगांडाची राजधानी कंपाला येथे १९६०- ७० च्या दरम्यान काम करत असतानाचा अनुभव त्यांनी सांगितला. काही गुंतागुंतीमुळे तरुण मुलांच्या आईचे निधन झाले होते.

या कायद्यामुळे टेक्सासमध्ये बेकायदेशीर गर्भापातामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अहलूवालिया यांचा जन्म केनियामध्ये झाला होता. त्यांचे वडील पंजाबमधून तिकडे गेले होते. त्यांनी या कायद्याचा स्वीकार केला असून त्यानुसार काम करणार आहेत.

Exit mobile version