ब्रिटनला भारताने ठणकावले; भारतविरोधी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करा

समाजकंटकांची भारतात पाठवणी करा, अशी डोभाल यांची मागणी

ब्रिटनला भारताने ठणकावले; भारतविरोधी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करा

कट्टरवाद्यांकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याबाबत भारत आणि ब्रिटनमध्ये सहमती झाली. तसेच, लोकशाही देशात अशा प्रकारच्या कारवायांना स्थान असता कामा नये, असे दोन्ही देशांनी ठासून सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी ब्रिटनमधील त्यांचे समकक्ष टिम बॅरो यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. बॉरो हे ब्रिटन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत भारतभेटीवर आले आहेत.

 

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांना जीवे मारण्याची धमकी तेथील स्थानिक कट्टरवाद्यांकडून देण्यात आली आहे. अशा समाजकंटकांची भारतात पाठवणी करून किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ब्रिटन सरकारने एकूणच कठोर पावले उचलावी, अशी मागणी डोभाल यांनी यावेळी केली. त्यावर, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला कदापि स्वीकारला जाणार नाही, अशी ग्वाही ब्रिटनकडून देण्यात आली.

 

हे ही वाचा:

आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

बांग्लादेशी मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्याची ‘घरवापसी’

नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दोन्ही क्रिकेट संघ खेळणार

‘दोन्ही देशांमध्ये दहशतवादाला रोखणे, दहशतवादाचा निधी रोखणे, दहशतवादी कारवायांसाठी इंटरनेटचा तसेच, अमली पदार्थांचा वापर होऊ न देणे आणि कट्टरतावाद रोखणे, आदी मुद्द्यांवर सहमती झाली,’ असे सूत्रांनी सांगितले. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या आणि उगवत्या तंत्रज्ञानाबद्दल सहकार्य करण्याबद्दलही सहमती दर्शवण्यात आली.

 

या भेटीमुळे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संवाद आणखी वाढतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली. या भेटीतून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेमध्ये दोन्ही देशांनी त्यांची धोरणात्मक भागीदारी कायम राहील, याची ग्वाही दिली. तसेच, दोन्ही देशांच्या सुरक्षेसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

Exit mobile version