राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्यामुळे सर्वत्र जल्लोष दिसत आहे. हा असाच उत्साह जगभरातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान सातासमुद्रापार अमेरिकेतही दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचं अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी डॉ. जिल बायडन यांनी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी दिवाळी साजरी केली. अमेरिकेतील राष्ट्रपती भवनाच्या पूर्व कक्षात दोनशेहून अधिक प्रतिष्ठित भारतीय- अमेरिकन लोकांनी एकत्र येत दिवाळी उत्साहात साजरी केली.
United States | US President Joe Biden and First Lady Jill Biden hosted a Diwali reception at the White House
(Source: White House Twitter handle) pic.twitter.com/rT6TTBrubi
— ANI (@ANI) October 25, 2022
या वेळी व्हाईट हाऊसच्या पूर्व कक्षात काही आकर्षक असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. सितारवादक ऋषभ शर्मा आणि नृत्य मंडळ ‘द सा डान्स कंपनी’ यांचा समावेश होता. पारंपारिक भारतीय पोशाखात पाहुण्यांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली होती.
व्हाईट हाऊसमधील दिवाळी सेलेब्रेशनसाठी यूएस- इंडिया बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष अतुल केशप उपस्थित होते. “भारतीय- अमेरिकन म्हणून येथे येण्याचा मला सन्मान वाटतो. भारतीय- अमेरिकन समुदायानं अमेरिकेत काय साध्य केलंय? हा उत्सव या प्रश्नाचं खरं उत्तर आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हे ही वाचा:
म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
मुंबई विकास महामंडळ; रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार
दिवाळी सेलिब्रेशनच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, “या उत्सवाचं आयोजन करण्याची संधी मिळाली, ही सन्मानाची बाब आहे. व्हाईट हाऊसमध्ये साजरी होणारी ही अशा प्रकारची पहिलीच दिवाळी आहे. आज अमेरिकेत पूर्वीपेक्षा जास्त आशियाई-अमेरिकन आहेत. दिवाळी सणाला अमेरिकन संस्कृतीचा भाग बनवल्याबद्दल आभारी आहोत. दिवाळी आपल्याला आठवण करून देते की, आपल्यापैकी प्रत्येकामध्ये जगाला प्रकाशमान करण्याची ताकद आहे.”