स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरा घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केलं होतं. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला देशभरातल्या नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ध्वज वितरणापासून तर तो फडकवण्यापर्यंत विविध योजना आखल्या जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने २५ लाख राष्ट्रीय ध्वज वितरीत करणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे.
या योजनेला भाजपा विरोधकांनी विरोध केलेला असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र स्वतः तिरंग्याची मोहीम राबविली आहे. काँग्रेस व इतर विरोधकांप्रमाणे निदान केजरीवाल यांनी तिरंग्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचणार नाही, असे पाऊल उचलले आहे, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
दिल्लीत २५ लाखांपेक्षा जास्त अधिक तिरंग्यांचे वाटप केले जाईल असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, जे स्वत: तिरंगा बनवू शकतात किंवा विकत घेऊ शकतात त्यांनी तसे केले पाहिजे. सरकारी शाळांतील प्रत्येक मुलाला तिरंगा दिला जाईल जेणेकरून ते आपल्या घरी घेऊन जातील आणि हातात तिरंगा घेऊन कुटुंबासोबत राष्ट्रगीत गाऊ शकतीलगल्ली, मोहल्ला आणि चौकात तिरंग्याचे वाटप केले जाईल असेही ते म्हणाले.
हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गा
लोक खूप आनंदी आहेत. विविध सरकारे आपापल्या स्तरावर तो साजरा करत आहेत. ते म्हणाले की, मी लोकांना आवाहन करू इच्छितो की १४ तारखेला आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी पाच वाजता प्रत्येक भारतीयाने हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गायले पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलं आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
मंगळुरूत फडकणार ६० हजार ध्वज
मंगळुरू सिटी कॉर्पोरेशनने १३ ऑगस्टपासून तीन दिवसांसाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात किमान ६०,००० ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असल्याचे महापौर प्रेमानंद शेट्टी आणि आयुक्त अक्षय श्रीधर यांनी सांगितले. सर्व घरे, सरकारी कार्यालये आणि इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यात १७ लाख तिरंगा
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील घराघरात १७ लाख तिरंगा फडकवण्यासाठी वितरित केले जाणार आहेत. ठाणे हद्दीत एकूण ३ लाख ९२ हजार ४७८ घरे आणि १३ लाख खासगी व सरकारी इमारती आहेत. या मालमत्तांवर १७ लाख झेंडे फडकवण्याची योजना आखण्यात आली असल्याचे ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या निमित्ताने ८० हजार विद्यार्थी तिरंगा राजदूत तर ७,५०० विद्यार्थी तिरंगा स्वयंसेवक बनणार आहेत .