यूएस जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्क मिल्ली यांनी मंगळवारी उच्चस्तरीय सिनेट समितीसमोर अफगाणिस्तान विषयावर वक्तव्य केले. यावेळी संपूर्ण जगासमोर त्यांनी उघड केले की त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना अफगाणिस्तानमध्ये सुमारे २,५०० अमेरिकन सैनिक तैनात ठेवण्याची शिफारस केली होती. परंतु लष्करी तज्ज्ञांचा सल्ला न ऐकता बायडन यांनी सर्व अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावले.
जनरल मिली यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. तालिबानने अल कायदा दहशतवादी संघटनेशी आपले संबंध पूर्णपणे तोडलेले नाहीत असंही ते म्हणाले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन पसाकी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या परिस्थितीचे काय करावे याविषयी बायडन यांना उच्च स्तरीय नेत्यांकडून “मतभेद असलेले” सल्ले मिळाले होते. अमेरिकेने २० वर्षांपूर्वी २००१ साली ९/११ च्या न्यूयॉर्कमधील ‘ट्वीन टॉवर’ हल्ल्यानंतर आलं कायदाच खात्मा करण्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते.
जनरल मार्क मिल्ली, यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल केनेथ मॅकेन्झी आणि संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांना अमेरिकेने अफगाणिस्तानातून घेतलेली माघार आणि काबूल विमानतळावर अराजकता निर्माण करण्याबद्दल सिनेटच्या संरक्षण समितीच्या सदस्यांनी पाचारण केले होते. यावेळी सुमारे सहा तास या सर्व अधिकाऱ्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागले होते.
जनरल मिल्ली आणि जनरल मॅकेन्झी यांनी सिनेट समितीसमोर साक्ष दिली की त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सुमारे २,५०० सैन्य जमिनीवर राहण्याची शिफारस केली होती.
तालिबानच्या हल्ल्यात अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्याने अमेरिकेची विश्वासार्हता ‘खराब’ झाल्याचा दावाही मिल्ली यांनी केला.
हे ही वाचा:
लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!
नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’
पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?
“मला वाटते की जगभरातील सहयोगी देशनाबरोबर आणि विरोधकांमध्ये आमची विश्वासार्हता कमी झाली आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना होती आणि आहे आणि त्यांनी अजूनही अल कायदाशी संबंध तोडलेले नाहीत, ज्याने ११ सप्टेंबर २००१ रोजी अफगाणिस्तानातून हल्ल्याचा कट रचला होता.