पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी टेक कंपन्यांच्या प्रमुख सीईओंबरोबर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर गूगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया असं लक्ष्य आहे, असं पिचाई यांनी म्हटलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे लक्ष्य आहे. त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिझाईन इन इंडिया’ यासाठी प्रेरित केले. भारतात पिक्सेल फोन बनवण्याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान मोदी हे सुनिश्चित करू पाहत आहेत की भारतातील लोकांना एआयचा फायदा कसा होईल. ते आम्हाला एआयच्या जगात अधिक गोष्टी करण्याचे आव्हान देत आहेत जेणेकरून भारतातील लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल,” असं सुंदर पिचाई म्हणाले.
“एआयचा वापर करून हेल्थकेअर, शिक्षण, कृषी अशा अनेक क्षेत्रातील ऍप्लिकेशन निर्माण करण्याचे त्यांनी सुचवले आहे. ते भारताच्या पायाभूत सुविधांबद्दलही विचार करत आहेत; मग ते डेटा केंद्र असो, ऊर्जा असो. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही भारतामध्ये एआयमध्ये गुंतवणूक करत आहोत. आम्ही अनेक कार्यक्रम आणि भागीदारी निश्चित केली आहे. त्यांनी नेहमीच आम्हाला भारतासाठी नवे आणखी काही करण्याचे आव्हान दिले आहे. एआय भारतातील लोकांच्या फायद्यासाठी आहे आणि ते सर्व भारतातील लोकांच्या सेवेत असले पाहिजे अशी त्यांची स्पष्ट दृष्टी आहे,” असा विश्वास सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला.
#WATCH | New York, USA: After the roundtable meeting of prominent CEOs of Tech Companies with PM Narendra Modi, Google CEO Sundar Pichai says, "The PM has been focussed on transforming India. It is Digital India vision. He pushed us to continue making in India, designing in… pic.twitter.com/kF2XwV5X2F
— ANI (@ANI) September 23, 2024
हे ही वाचा :
प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन
अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती
आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी
अमेरिका दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदींनी तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक घेतली. या दरम्यान भारतातील विकासाच्या शक्यतांवर भर देण्यात आला. एआय, सेमीकंडक्टर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या १५ आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांचे सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते.