24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियामुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

Google News Follow

Related

मुंबईकरांचा आवडीचा ऋतु म्हणजे ‘पावसाळा’ अनेक मुंबईकर ‘चिलआउट’ होण्यासाठी धबधब्यांच्या शोधात जवळपासच्या परिसरात फिरतात. धबधब्यावर फेर फटका मारून पुन्हा नेहमीच्या कामाला सुरुवात करतात. मात्र आलेले हे पर्यटक खाऊच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या किंवा कचऱ्याच्या पिशव्या धबधब्याजवळ टाकून येतात. विशेष म्हणजे दारूच्या बाटल्याही इथे सापडतात. मुंबईचा धर्मेश बारई या युवकाला २०१६ रोजी ही बाब जाणवली. तेव्हापासून बारई या तरुणाने धबधब्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. यामध्ये खारफुटी, तलाव स्वच्छतेसाठी ही प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांची जलशक्ती मंत्रालयाने दखल घेतली असून, यंदाचा ‘जलनायक’ (वॉटर हिरो) सन्मान धर्मेश बराई याला जाहीर झाला आहे.

बराईसोबत कर्नल शशी दळवी, आर्यन गौर, आदित्य कुमार, रामवीर तंवर आणि स्पर्श सहानी यांनाही जलनायक पुरस्कार जाहीर झाला आहे. या विजेत्यांना सन्मान चिन्हासह दहा हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. २०१६ पासून आतापर्यंत मुंबई येथे सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून मुंबई व आसपास मधील परिसरातून २१ ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबवल्या आहेत. धबधब्यांमधून आतापर्यंत ११ टन कचरा गोळा करण्यात आला असून त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांचा समावेश आहे. मागील सहा वर्षापासून स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विदयार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

हे ही वाचा:

सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या मारवाडी टोळीचे पितळ उघडे

केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचं होणार ऑडिट

“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”

द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार

रोहन भोसले आणि श्रीराम शंकर या दोन मित्रांना सोबत घेऊन कोरोना काळात खारफुटी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली. ते समाजमाध्यमांतून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले असून, त्यातूनच त्यांना स्वच्छता या कामासाठी नवी मुंबई महापालिकेची मदत झाली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी खारफुटी स्वच्छता मोहिमेचे १०० आठवडे पूर्ण केले आहेत. महापालिकेला विनंती करून, कचऱ्याच्या उगमाबद्दल माहिती देऊन जाळ्याही बसवून घेतल्या आहेत. तसेच पुढाकार घेऊन सीवूड-बेलापूर येथील लोटस लेक येथील डेब्रीज डम्पिंग थांबवले आहे. नवी-मुंबई येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई अशी बिरुद मिरवणारा तलाव जलपर्णीने भरला असून तलावाच्या स्वच्छतेसाठी ही पुढाकार घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा