स्पुतनिक-५ च्या आयातीला आणि वापराला परवानगी

स्पुतनिक-५ च्या आयातीला आणि वापराला परवानगी

डीजीसीआयने डॉ. रेड्डीज लॅबला स्पुतनिक-५च्या आयातीवर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी २०१९च्या ‘न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल रुल्स’ नुसार देण्यात आली आहे. या लसीच्या परवानगीला डीजीसीआयने कालच परवानगी दिली आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये डॉ. रेड्डीज लॅब आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड सोबत (आरडीआयएफ) भारतातील स्पुतिनक-५च्या क्लिनिकल ट्रायल आणि वितरणासाठी करार केला होता.

हे ही वाचा:

टाळेबंदीच्या धास्तीने मुंबईकरांची जास्तीची खरेदी

लॉकडाऊनची घोषणा आजच?

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

कुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा

या लसीच्या रशियात चाचण्या घेऊन झाल्या आहेत. त्यासोबतच भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना प्रारंभ झाला आहे. भारतातील या चाचण्या डॉ रेड्डीज तर्फे घेतल्या जात आहेत.

डॉ. रेड्डीजचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी व्ही प्रसाद यांनी सांगितले की, भारतातील सध्या वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी मार्ग उपलब्ध आहे.

“यामुळे आम्हाला देशाच्या कोविड विरोधी लढ्यात योगदान देणे शक्य होईल” असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारताने परवानगी दिल्यानंतर, स्पुतनिक-५ ला परवानगी दिल्यानंतर या लसीचा एकूण ६० देशांमध्ये वापर सुरू झाला आहे. जगातील विविध सरकारांनी परवानगी देऊन वापर सुरू केलेल्या लसींत, या लसीचा दुसरा क्रमांक लागतो.

स्पुतनिक-५ मध्ये दोन डोसेज् करता दोन वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला वापरला जातो. या लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के असल्याचे लँसेट या जागतिक दर्जाच्या, वैद्यकशास्त्रातील जुन्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात सांगितले आहे.

Exit mobile version