अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

अमेरिकेमध्ये कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर सायबर हल्ला झाल्यानं प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोठ्या इंधन वाहतूक करणाऱ्या पाईपलाईन यंत्रणेवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाल्यानं तातडीनं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारनं घेतला आहे.

कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज २५ लाख बॅरल तेल वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांना या पाईपलाईन द्वारे ४५ टक्के इंधन पुरवठा केला जातो. हॅकर्सनं शुक्रवारी सायबर हल्ला केला.त्यानंतर पाईपालईनद्वारे होणारी गॅस वाहतूक थांबली आहे. रॅन्समवेअरद्वारे सायबर हल्ला डार्कसाईडच्या हॅकर्सनं केल्याची प्राथमिक माहिती आहे. हॅकर्सनी कोलोनियल पाईपलाईन कंपनीचा १०० जीबी डाटावर नियंत्रण मिळवलं आहे. यानंतर त्यांनी काही कॉम्प्युटर लॉक केले असून काही डाटा लॉक केला आहे. डाटा परत करण्यासाठी हॅकर्सनी अमेरिकेकडे पैशाची मागणी केली आहे.

कोलोनियल पाईपलाईनवर सायबर हल्ला झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तेल पुरवठा जवळपास थांबल्यात जमा आहे. इंधन तेलाची कमतरता जाणवू नये म्हणून अमेरिकेत प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. गॅसोलिन, डिझेल, जेट फ्यूल आणि पेट्रोलियम पदार्थांची रस्तेमार्गे वाहतूक करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, इंधनाची कमतरता जाणवू नये म्हणून तातडीनं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोलोनियल पाईपलाईन वर करण्यात आलेल्या साबर हल्ल्याचा परिणाम अनेक राज्यांवर झालेला पाहायला मिळाला. अलाबामा, आर्कन्सा, फ्लोरिडा, जॉर्जिया, केंटकी, मिसीसीपी, न्यूजर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सलवेनिया, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि इतर काही राज्यांवर याचा परिणाम झाला आहे. अमेरिकन प्रशासनानं प्रादेशिक आणीबाणी जारी करुन इंधन तेलाची वाहतूक रस्तेमार्गे करण्याचे आदेश दिले आहेत. कोलोनियल पाईपलाईन कंपनींनं पर्यायी पाईपलाईन सुरु केली असली तरी मुख्य पाईपलाईनवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे.

हे ही वाचा:

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस

सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर

अमरावतीत १५ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्यांनी लस खरेदी करावी

कोलोनियल कंपनीचं कर्मचारी अभियंते कोरोना संसर्ग सुरु असल्यानं घरुन काम करत आहेत. हॅकर्सनी याचा फायदा घेत डेस्कटॉप शेअरिंगचा डाटा खरेदी करुन त्यानंतर त्याद्वारे सायबर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारपर्यंत कोलोनियल पाईपलाईनाची सेवा पूर्ववत झाली नाहीतर अमेरिकेवर याचा मोठा परिणाम जाणवू शकतो.

Exit mobile version