28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियावर्ल्डकप जिंकूनही अर्जेंटिना नंबर वन नाहीच!

वर्ल्डकप जिंकूनही अर्जेंटिना नंबर वन नाहीच!

अर्जेंटिनाने फ्रान्सला नमवून वर्ल्डकप जिंकला होता

Google News Follow

Related

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाने विजेतेपद मिळविले खरे पण त्यांना जागतिक क्रमवारीत मात्र अव्वल स्थान मिळविता आलेले नाही. ब्राझील अजूनही अव्वलस्थानी कायम आहे.

फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत जरी पराभव पत्करावा लागला,तरीही त्यांनी जागतिक क्रमवारीत आपले स्थान अव्वल राखले आहे. क्रीडावाहिनी इएसपीएनच्या मते फेब्रुवारी पासून बेल्जिअमला मागे टाकत ब्राझीलने आपले स्थान अव्वल राखले आहे. अर्जेन्टिनाला विश्वचषक पटकावून सुद्धा ब्राझीलला या क्रमवारीत नमवता आले नाही. १८ डिसेंबरला अर्जेन्टिनाने आपला  पहिला विश्वचषक १९८६ नंतर पहिल्यांदाच जिंकला आणि अंतिम फेरीत पेनल्टीवर ४-२ असे फ्रान्सला पराभूत केले. ब्राझीलने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी त्यांना विश्वचषकामधे पराभव पत्करावा लागला होता. कॅमेरुनकडून कडून त्यांना हार पत्करावी लागली. क्रोएशियाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे जागतिक फुटबॉल स्पर्धेतून ते बाहेर पडले.

सौदी अरेबियाविरुद्ध सलामीचाच सामना गमवून अर्जेन्टिनाने उर्वरित ४ सामने जिंकले. अंतिम फेरीत त्यांनी पेनल्टी शूट आऊट मध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. २०२१ मध्ये अर्जेन्टिना कोपा अमेरिका ही स्पर्धा जिंकूनही त्यांना पहिले स्थान मिळालेले नाही. फ्रान्स किंवा अर्जेन्टिना जर आपल्या ३० मिनिटाच्या अतिरिक्त वेळेसह १२० मिनिटांत जिंकले असते तर त्यांना पहिला क्रमांक मिळाला असता. अर्जेन्टिना फ्रान्स अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असून, अपयशी ठरलेल्या बेल्जियमची २ स्थानाने घसरण होऊन चौथ्या स्थानावर आले आहेत. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे इंग्लंड ५ व्या स्थानावर आहे तर नेदरलँड दोन स्थाने पुढे सरकत सहाव्या स्थानावर पोचले आहे.

हे ही वाचा: सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर

कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?

९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश

साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’

नवीन फिफा रँकिंग टॉप २० पुढीलप्रमाणे आहेत १ ब्राझील २अर्जेन्टिना ३फ्रान्स ४बेल्जियम ५इंग्लंड ६नेदरलँड ७क्रोएशिया ८इटली ९पोर्तुगाल १० स्पेन ११मोरक्को १२स्विझर्लंड १३ यूएसए १४ जर्मनी १५मेक्सिको १६उरुग्वे १७कोलंबिया १८डेन्मार्क १९सेनेगल २० जपान आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा