थकबाकी असतानाही कोल इंडियाने केली राज्याच्या कोळसा पुरवठ्यात वाढ

थकबाकी असतानाही कोल इंडियाने केली राज्याच्या कोळसा पुरवठ्यात वाढ

सध्या महाराष्ट्रात लोडशेडींग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती समोर आली आहे, राज्य वीज निर्मिती कंपनी महाजेनेकोने कोल इंडियाची तब्बल २ हजार ३९० कोटी रुपयांची थकबाकी ठेवली आहे. तरीही सध्या महाराष्ट्रातील वीजसंकट लक्षात घेऊन कोल इंडियाने महाराष्ट्राचा कोळशाचा पुरवठा ३० टक्क्यांनी वाढवला आहे.

राज्यात विजेचे संकट आहे, अनेक ठिकाणी लोडशेडींग सुरु आहे. हे महाराष्ट्रातील विजेचे संकट लक्षात घेऊन कोल इंडियाने राज्याची थकबाकी असतानाही राज्याचा या महिन्यापासून पुरवठा वाढवला आहे. कोल इंडियाने महाजेनको या राज्य वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीला २०२१-२२ मध्ये ३७ दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा केला आहे.

मार्चमध्ये महाजेनकोला दररोज ०.९६ लाख टन कोळशाचा पुरवठा होत होता. जो एप्रिलमध्ये वीजसंकट लक्षात घेऊन १.३२ लाख टन करण्यात आला आहे. कोळसा मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना २०२१-२२ मध्ये ७०.७७  दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला होता. विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे पुरवठा वाढवण्यात आला होता. मार्चमध्ये वीज प्रकल्पांना दररोज २.१४ लाख टन पुरवठा होत होता आणि आता एप्रिलमध्ये तो २.७६ लाख टन प्रतिदिन झाला आहे.

हे ही वाचा:

सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडली पैसे मोजायची मशीन

श्रीलंकन ​​नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्या सहा जणांना फाशी

राज्यात लोडशेडिंग कोळशाच्या तुटवड्यामुळे आणि वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे राज्यात वीजसंकट आहे. सोमवारी, १९ एप्रिल रोजी सर्वाधिक उर्जेची मागणी २६ हजार ते २७ हजार मेगा दरम्यान होती. दरम्यान, महाजेनेकोने दिलेल्या माहितीनुसार, कोल इंडियाच्या थकबाकी रकमेपैकी १ हजार ४०० कोटी रक्कम ही निर्विवाद असून उरलेली रक्कम विवादात आहे.

Exit mobile version