24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाफडणवीस डॉक्टर झाले! विकासकामांच्या दूरदृष्टीबद्दल जपानकडून मानद डॉक्टरेट

फडणवीस डॉक्टर झाले! विकासकामांच्या दूरदृष्टीबद्दल जपानकडून मानद डॉक्टरेट

१२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील विद्यापीठाकडून गौरव करण्यात आला आहे. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली आहे. यावेळी मंत्री दिपक केसरकर, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच व्यक्ती आहेत.

मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही पहिली मानद डॉक्टरेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट महिन्यात जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना कोयसान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली होती.

हे ही वाचा:

नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

सपा खासदार शफीकुर रेहमान याना बाबरी पुन्हा मिळवण्याची हौस!

शेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि…

जय श्रीराम: प्रभू श्रीरामांच्या आजोळातून ३ हजार क्विंटल तांदूळ, सासरकडून सुका मेवा!

२०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्‍यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा