डेन्मार्क – फिनलँडचा सामना पुन्हा सुरु

डेन्मार्क – फिनलँडचा सामना पुन्हा सुरु

डेन्मार्क विरुद्ध फिनलँड यांच्यातील रद्द करण्यात आलेला युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा सामना पुन्हा खेळवला जाणार आहे. युएफाकडून यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विनंती केल्यानंतर युएफाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यामुळे हा सामना रद्द करायचा निर्णय युएफाकडून घेण्यात आला होता.

शनिवार, १२ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता डेन्मार्क आणि फिनलँड या दोन संघाचा सामना सुरू होता. यात डेनमार्क संघाचा महत्त्वाचा खेळाडू क्रिश्चियन एरिक्सन हा मैदानात अचानक कोसळल्यामुळे सामन्यात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. त्यामुळेच हा सामना रद्द करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला होता. पण एरिक्सन याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. तसेच एरिक्सन शुद्धीत आल्याचीही माहिती मिळाली.

हे ही वाचा:

एरिक्सन कोसळला, सामना स्थगित

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स आठवा सामनाही अनिर्णीत

ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर

एरिक्सनच्या प्रकृतीला धोका नसल्याचे समजताच डेन्मार्क आणि फिनलँड या दोन्ही संघांकडून युरो स्पर्धेची आयोजक असलेल्या युएफाला उर्वरित सामना पुन्हा खेळवला जावा अशी विनंती करण्यात आली. दोन्ही देशाच्या खेळाडूंनी केलेली ही विनंती यूएफाकडून स्विकारण्यात आली आहे. सुरवातीला सामन्याच्या पहिल्या सत्राची उर्वरित ५ मिनिटे खेळवली जातील. त्यानंतर ५ मिनिटांचे मध्यांतर असेल आणि नंतर सामन्याचे दुसरे सत्र खेळवले जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजता हा सामना पुन्हा सुरु होणार आहे.

Exit mobile version