कोविड काळात भारताच्या दुग्धजन्य पदार्थांनी ५५० कोटी निर्यात नोंदवली आहे. ११० देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात संयुक्त अरब अमिराती देशात आहे. ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड एक्सपोर्टस डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या अहवालात हे माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा: विदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा
यावर्षी भारताने संयुक्त अरब अमिराती मध्ये सर्वाधिक १५४ कोटींची निर्यात केली आहे. त्या पाठोपाठ अमेरिका (११० कोटी), भूतान (७८ कोटी), सिंगापुर (५३ कोटी), सौदी अरब (३९ कोटी) आणि ऑस्ट्रेलिया (३७ कोटी) या देशांचा क्रमांक आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षात भारताची दुग्धोत्पादनाची निर्यात अनुक्रमे २४२३ कोटी आणि १३४१ कोटी होती. या वर्षी जागतिक महामारीच्या फटक्याने जगभरातील आर्थिक गणिते बदलली आहेत, पण अशा परिस्थितीतही ५५० कोटींची निर्यात ही सकारात्मक बाब मानली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवला जात आहे.
भारतातून होणारी निर्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजराथ या राज्यातून आहे. परदेशात भारतीय तुपाला सर्वाधिक मागाणी आहे.