दिल्ली ते मुंबई फक्त १२ तासांत

दिल्ली ते मुंबई फक्त १२ तासांत

९० हजार कोटींचा महामार्ग तयार होतोय

दिल्ली आणि मुंबई यांच्यातील अंतर लवकरच अवघ्या १२ तासांत कापले जाणार आहे. हो, देशातील दीर्घपल्ल्याच्या म्हणजेच १३५० किलोमीटर अंतर असलेल्या या महामार्गाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल, तेव्हा दिल्ली आणि मुंबई ही महानगरे १२ तासांवर असतील. दिल्ली-दौसा मार्गावरील हरयाणाच्या लोहतकी गावात या महामार्गाचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. ट्रक भरून माती नेली जात आहे, तिथे या महामार्गाचा पाया घातला जात आहे. ९० हजार कोटींच्या या महामार्गाचे स्वप्न येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. हा महामार्ग हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांतून जाणार आहे. दोन वर्षांत म्हणजे २०२३च्या जानेवारीत महामार्गाचे काम पूर्णत्वास येईल.
आठ लेन असलेल्या या महामार्गाच्या दोन्ही बाजुंना सहा फुटांच्या भिंती घालण्यात येणार आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आजूबाजूच्या गावातील प्राणी तसेच पादचारी येऊ शकणार नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा आणखी बरीच जागा शिल्लक ठेवली जाणार आहे, जेणेकरून भविष्यात हा महामार्ग १२ लेनचा करता येईल.

आशियातील हा असा पहिलाच मार्ग असेल जिथे अभयारण्यांच्या परिसरात पाच मार्ग ठेवण्यात येतील ज्यावरून प्राणी महामार्ग ओलांडून जाऊ शकतात. रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून या महामार्गादरम्यान मुकुंद्रा अभयारण्यातून भव्य बोगदाही काढण्यात येणार आहे. त्यामुळे आठ लेन असलेला हा देशातील पहिलाच बोगदा असेल. त्यामुळे महामार्गावरून ताशी १२० किमी वेगाने कायम प्रवास करता येईल. या संपूर्ण महामार्गाच्या दुतर्फा २० लाख झाडे लावण्यात येतील. त्यामुळे महामार्गावरील प्रवास आल्हाददायक होईल. या महामार्गाला ‘ग्रीन हायवे’ असे संबोधण्यात येणार आहे.

महामार्गादरम्यान, विविध ठिकाणी रेस्तराँ, उपाहारगृहे, पेट्रोल पंप अशा सुविधाही असतील. तेवढेच नव्हे तर हेलिपॅड्स आणि ट्रॉमा सेंटर्सचीही सुविधा तिथे असेल. या संपूर्ण योजनेचे संचालक असलेले सुरेश कुमार हे काम तडीस नेण्यासाठी १६-१६ तास कार्यरत आहेत.

या महामार्गासाठी ३५ लाख टन सीमेंट लागणार आहे तर पाच लाख टन पोलादाचा वापर केला जाणार आहे. ५० कोटी क्युबिक मीटर इतक्या जमिनीवर या महामार्गाचा पाया घातला जाणार आहे. या महामार्गामुळे दरवर्षी ३२ कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. जवळपास १५ हजार हेक्टर इतकी जमीन यासाठी संपादित केली जाणार असून त्यापैकी ९० टक्के जमिनीचे संपादन झालेले आहे. गुजरातमधील काही भागातील जमिनीचे संपादन व्हायचे आहे, ते येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची ग्वाही दिली जात आहे. या संपूर्ण कामकाजावर ड्रोनच्या माध्यमातून बारकाईने लक्ष दिले जात आहे.

हे ही वाचा:

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर

जेईई परीक्षा तूर्तास स्थगित

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते

 

दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवे
व्हाया सोहना, दौसा आणि वडोदरा

गती : वेग ताशी १२० किमी

खर्च : ९० हजार कोटी

कार्यपूर्ती : जानेवारी २०२३

किती अंतर वाचेल : गाडीने १५० किमी

प्रवासाचा कालावधी : १२ तास

जमीन संपादन : ५ राज्यांतील १५ हजार हेक्टर जमीन

कच्चा माल : ५ लाख टन पोलादाचा वापर (२० हावडा पुलांसाठी लागेल इतके पोलाद), ३५ लाख टन सीमेंट

वृक्षलागवड : २० लाख वृक्षलागवड

– या महामार्गासोबत प्रथमच उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी –

 

– महामार्गाच्या कामाची सुरुवात अशी झाली-

Exit mobile version