26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियादिल्ली भाजपची 'मालिवाल' यांना निलंबित करण्याची मागणी

दिल्ली भाजपची ‘मालिवाल’ यांना निलंबित करण्याची मागणी

आरोपी आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता

Google News Follow

Related

दिल्ली भाजपने शनिवारी लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांना पत्र लिहून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना “ कथित इव्ह-टीझिंग” या घटनेची पोलिस चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून निलंबित करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. दिल्ली भाजप नेते वीरेंद्र सचदेवा यांनी आरोप केला की कॅब ड्रायव्हर हा दक्षिण दिल्लीतील संगम विहारमधील प्रमुख आपचा कार्यकर्ता आहे.

भाजपच्या दिल्ली युनिटने ट्विटरवर आरोप केला होता की आप आणि एका हिंदी वृत्तवाहिनीने दिल्ली पोलिसांची बदनामी करण्याच्या उद्देशाने “कथित स्टिंग ऑपरेशन” राबविले होते, पण अटक करण्यात आलेल्या जलद पोलिस कारवाईमुळे ते अयशस्वी झाले.भारतीय जनता पक्षाने  शुक्रवारी  मालीवाल यांच्या स्टिंग ऑपेरेशन वर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की संपूर्ण घटना म्हणजे दिल्ली पोलिसांची प्रतिमा वाईट करण्याचा कट होता.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

शनिवारी पहाटे,दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी एल जी सक्सेना यांना पत्र लिहून पोलिसांनी आजूबाजूच्या घटनांची चौकशी करेपर्यंत मालीवाल यांना पदावरून हटवण्याची विनंती केली आहे. सर्वांनी या घटनेचा निषेध केला असून हे लक्षात घेणे समाधानकारक आहे की, या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आणि एका तासाच्या आत कथित इव्हेटिझरला अटक केली परंतु यावरील मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करतात की इव्हेटिझर गुंतलेला हरीश चंद्र सूर्यवंशी हा ‘आम आदमी पार्टीचा’ सक्रिय कार्यकर्ता आहे असेही कपूर म्हणाले.

मालीवाल यांच्याशी संबंधित घटनेचे व्हिडिओ फुटेज शुक्रवारी समोर आल्यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एलजी सक्सेना यांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर केला. भाजपने या घटनेला मालीवाल आणि एका हिंदी वृत्तवाहिनीने रचलेले “घाणेरडे षडयंत्र” म्हटले असतानाही केजरीवाल यांनी एलजींना आप सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याऐवजी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा