कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी पालिका प्राणवायू प्रकल्प उभारत आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पण हे प्रकल्प उभारण्यास विलंब केल्याप्रकरणी नोटीस बजावलेल्या कंत्राटदारावर प्रशासनाने पुन्हा कृपादृष्टी केल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या जम्बो कोरोना उपचार केंद्रात प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी दोन कंत्राटदारांना नेमण्यात येणार असून ६७ कोटींचे काम या कंत्राटदाराला देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. पालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ८४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने कंपनीवर प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
…म्हणे भारताचे प्रकल्प सुरक्षित
रेल्वे प्रवास करा, पण प्रवेशद्वार बंद…काय करावे आता?
आता ११ जम्बो कोरोना केंद्रांमध्येही प्राणवायू प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले असून त्याकरिता पालिका २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी दोन कंत्राटदारांची निवड करण्यात आली. यातही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ६६ कोटी ८४ लाख कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. आधीच्या कामात विलंब केल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यामुळे भाजपकडून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.