मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या आठवड्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही त्यापूर्वीच्या आठवड्यातील रुग्ण संख्येपेक्षा कमी होती. जागतिक पातळीवर ३.६ दशलक्ष नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापूर्वीच्या आठवड्यात रुग्ण संख्या चार दशलक्ष इतकी नोंदवली गेली होती. जगातील प्रत्येक भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे आणि गेल्या आठवड्यातील रुग्ण संख्या घसरणीमुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीतील ही पहिली लक्षणीय घट दिसून आली आहे.
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालामध्ये डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दोन क्षेत्रांमधील रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. रुग्ण संख्येमध्ये मध्य- पूर्व भागात २२ टक्के आणि दक्षिणपूर्व आशियात १६ टक्के घट दिसून आली.संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात ६० हजार पेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. म्हणजेच मृत्यूंचे प्रमाण ७ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व आशियामध्ये कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमध्ये ३० टक्के घट नोंदवली गेली आहे, तर पश्चिम पॅसिफिक प्रदेशात ७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
हे ही वाचा:
डोंबिवली हादरले! अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार
‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार
किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये
बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी
अमेरिका, भारत, ब्रिटन, तुर्की आणि फिलिपिन्समध्ये सर्वाधिक कोरोना व्हायरसची प्रकरणे दिसून आली. डब्ल्यूएचओने सांगितले की वेगाने पसरणारा ‘डेल्टा’ हा प्रकार आता १८५ देशांमध्ये दिसला आहे आणि जगाच्या प्रत्येक भागात आढळून आला आहे. संस्थेने त्यांच्या प्रकारांची सुधारित यादी तयार करून त्यातील मोठा उद्रेक करू शकणाऱ्या प्रकारांची नावेही यादीत नोंदवली आहेत. ‘लॅम्बडा’ आणि ‘म्यू’ या दोन प्रकारांचा मागोवा घेत असून हे दोन्ही लॅटिन अमेरिकेत उद्भवले आहेत; परंतु अद्याप व्यापक साथीला कारणीभूत नाहीत, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.