“नेपाळच्या नोटेवर भारताच्या तीन भागांचा समावेश असणारा नकाशा छापण्याचा निर्णय हा एकतर्फी”

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावले खडेबोल

“नेपाळच्या नोटेवर भारताच्या तीन भागांचा समावेश असणारा नकाशा छापण्याचा निर्णय हा एकतर्फी”

नेपाळने शुक्रवारी लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या वादग्रस्त प्रदेशांना दर्शविणाऱ्या नकाशासह १०० रुपयांची नवीन नोट छापण्याची घोषणा केली आहे. नेपाळच्या या निर्णयानंतर आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. अशातच भारताने नेपाळच्या या निर्णयाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी नेपाळच्या सरकारमधील मंत्री रेखा शर्मा यांनी सांगितले की, नेपाळच्या १०० रुपयांच्या नव्या नोटेवरील नकाशात लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे तीन प्रदेश दाखवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० रुपयांच्या नोटांमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी यांचा समावेश असलेल्या नेपाळचा नवा नकाशा छापण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे त्या म्हणाल्या. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, नेपाळ सरकारच्या या वादग्रस्त निर्णयानंतर भारतानेही भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “नेपाळ सरकारच्या या निर्णयाने वास्तविक परिस्थिती बदलणार नाही. मुळात या प्रकरणावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. या तिन्ही प्रदेशांवरून दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. असे असतानाही नेपाळने त्यांच्या नोटांवरील नकाशात हे प्रदेश दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी आहे.”

पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० रुपयांच्या नोटांमध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी यांचा समावेश असलेल्या नेपाळचा नवा नकाशा छापण्याचा निर्णय घेण्यात आला. नेपाळच्या संसदेत या वादग्रस्त विधेयकाच्या बाजूने २७५ पैकी २५८ मतं पडली होती.

१८ जून २०२० रोजी नेपाळने तीन सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्रे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी आपल्या घटनेत सुधारणा करून देशाचा राजकीय नकाशा अद्यायवत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. ज्यावर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आणि याला एकतर्फी कृत्य आणि अस्थिर कृत्य म्हटले होते. भारताने नेपाळच्या प्रादेशिक दाव्याचा कृत्रिम विस्तार असल्याचे घोषित केले होते. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा यांवर भारताचा हक्क आहे.

हे ही वाचा:

‘कॅनडा आमच्यावर आरोप करते, पण पुरावे देत नाहीत’

सुनील गावस्कर कोहलीवर बरसले!

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

कथित अनुचित कपडे परिधान करून व्हिडीओ

भारताच्या शेजारी देशांपैकी एक असलेला नेपाळ हा भारताचा जुना मित्र आहे. भारताने नेहमीच नेपाळला साथ दिली आहे. तसेच नेपाळच्या संकटकाळात भारताने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मात्र, मागच्या काही वर्षात भारत-नेपाळ संबंधात तणाव निर्माण होईल अशा काही घटना घडल्या आहेत. आता या नोटांवरील नकाशामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशातील संबंध खराब होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

Exit mobile version