गडकरी म्हणाले, येत्या ३-४ महिन्यांत इथेनॉलची इंजिन सक्तीचे

गडकरी म्हणाले, येत्या ३-४ महिन्यांत इथेनॉलची इंजिन सक्तीचे

नजिकच्या काळात प्रत्येक गाडीत फ्लेक्स फ्युएल इंजिन लावणे अनिवार्य असेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार वाहन निर्मिती कंपन्यांना प्रत्येक गाडीत फ्लेक्स फ्युएल इंजिन बसवणे सक्तीचे असेल.

महाराष्ट्रातील २२ महामार्गांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी आलेल्या गडकरी यांनी या नव्या निर्णयाबद्दल सांगितले.

गडकरी म्हणाले की, देशातील वाहननिर्मिती क्षेत्राने येत्या काळात इथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनांचा वापर करायला हवा. पेट्रोल आणि डिझेलचा वापर आता कमी व्हायला हवा.

गडकरी यांनी सांगितले की, मी येत्या तीन-चार महिन्यांत असा आदेशच देणार आहे की, बीएमड्ब्ल्यू, मर्सिडिज यांच्यासोबतच टाटा व महिंद्र या कार निर्माता कंपन्यांना फ्लेक्स इंजिन बनविण्यास सांगण्यात येईल. बजाज व टीव्हीएस कंपन्यांना आपल्या वाहनात फ्लेक्स इंजिन बसविण्यास सांगितले आहे.

फ्लेक्स फ्युएल हे ‘लवचिक’ इंधन म्हणून ओळखले जाते. गॅसोलिन आणि इथेनॉल यांच्या मिश्रणातून त्याची निर्मिती केली जाते.

हे ही वाचा:

रतन टाटा यांनी का केले नरेंद्र मोदींचे कौतुक?

लांबच लांब रांगांचे ठाणे

रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात

ऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय

गडकरी म्हणाले की, माझी अशी इच्छा आहे की, माझ्या जीवनकाळात पेट्रोल-डिझेलचा वापर कमी व्हावा. त्याजागी इथेनॉलचा पर्याय आपण उपयोगात आणू शकतो. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथेनॉल पंपाची उद्घाटन झाले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन आहे की, पश्चिम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात इथेनॉल पंप उभे केले गेले पाहिजेत. पुण्याला प्रदुषणातून मुक्त करण्याची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले.

Exit mobile version