कुनो राष्ट्रीय अभयारण्यात दोन चित्यांच्या झालेल्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चित्ता प्रकल्पावर टीका होऊ लागली आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या वन, मत्स्यपालन आणि पर्यावरण विभागाने मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दोन चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. चित्यांच्या मृत्यूमध्ये असामान्य असे काही नाही नाही. अशा प्रकल्पांमध्ये दोन चित्त्यांचा मृत्यू संवर्धन प्रकल्पाच्या “अपेक्षित” मृत्यू दराच्या आत आहे, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आफ्रिकेच्या वन विभागाने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यामुळे टीकाकारांची तोंडे गप्प झाली आहेत.
सप्टेंबर २०२२मध्ये नामिबियातून भारताच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये हस्तांतरित केलेल्या आठ सस्तन प्राण्यांमध्ये समावेश होता . कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत पाहिलेले दोन चित्ते मरण पावले आहेत. यामध्ये एक नामिबियातील आणि एक दक्षिण आफ्रिकेतील चित्ता आहे. अशा प्रकल्पात होणारे मृत्यू हे अपेक्षित सीमेमध्ये असल्याचे वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोठ्या मांसाहारी प्राण्यांचे पुन्हा पुनरुज्जीवन करणे ही एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि स्वाभाविकपणे जोखमीचे असते. या चित्यांना एक मोठ्या मोकळ्या वातावरणात सोडेले जात आहे हा या प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या समोरील धोके दिवसेंदिवस वाढत आहेत. चित्यांमध्ये दुखापत आणि मृत्यू होण्याचा धोका वाढत जाण्याची भीती देखील या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
वन विभाग सध्या चित्त्यांच्या मृत्यूच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहे. तथापि, आतापर्यंत चित्त्यांचा मृत्यू संसर्गजन्य रोगाने झाल्याचे आणि कुनोमधील इतर चित्त्यांना धोका असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत असेही सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
एअर इंडियात होणार एक हजार वैमानिकांची भरती
महाराष्ट्रदिनी माविआची असेल शेवटची वज्रमूठ
२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट
रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !
नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजीआठ चित्ते आणि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. यातील दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. २७ मार्च रोजी नामिबियातून आणलेल्या साशा या मादी चित्ताचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. दुसरीकडे, यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्ता उदयचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. उदयचा आजारी पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी सांगितले. कुनोमध्ये आता १८ चित्ता आणि चार बछडे उरले आहेत.