भय इथले संपत नाही.. मृतांची संख्या १६,००० च्या पुढे

भूकंपात ५० हजार पेक्षा जास्त लोक जखमी

भय इथले संपत नाही.. मृतांची संख्या १६,००० च्या पुढे

तुर्की आणि सीरियामधील भूकंपानंतरचे भय अजूनही संपलेले नाही. आपले प्रियजन अजूनही जिवंत असतील या आशेने नातेवाईक आपल्या ढिगाऱ्यात आप्तांचा शोध घेत आहेत. भूकंपाच्या तिसऱ्या दिवशी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर मृतांची संख्या १६,००० च्या पुढे गेली आहे. भूकंपात ५० हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांमुळे तुर्की आणि सीरियामध्ये रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. अनेक बहुमजली इमारती कोसळल्यामुळे आता मृतांचा आकडा १६,०० च्या पुढे गेला आहे. एकट्या तुर्कीमध्ये १२,८७३ आणि सीरियामध्ये ३,१६२ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मालमत्ता आणि मानवी नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले आहे की बचाव पथके असूनही त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. रात्रंदिवस ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे. हजारो इमारती पडल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे अवघड होत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. भारत सरकारने एनडीआरएफची टीमही बचावासाठी पाठवली आहे. तसेच अमेरिका, चीनसह अनेक देशांकडून दोन्ही देशांना मदत केली जात आहे. मात्र, असे असूनही बचाव पथक कमी पडले आहे. त्याचबरोबर भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर अजूनही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यही अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे.

Exit mobile version