३०,००० पेक्षा जास्त जखमी..६,००० पेक्षा जास्त इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर…मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो ऐकू येत आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके जीवाचे रान करत आहेत. भूकंपानंतर तुर्की आणि सीरियातील ही भयानक स्थिती आजही तशीच आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दुआन यांनी त्यांनी १० प्रभावित राज्यांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. या दुर्घटनेत ५,४०० पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तुर्की-सीरियामध्ये गेल्या २४ तासांत आलेल्या भूकंपाच्या पाच भीषण झटक्यांनी ७,७०० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. हा आकडा वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये तीस हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने, तुर्कीतील मृतांची संख्या आठ पटीने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सहा हजार पेक्षा जास्त इमारती कोसळल्या आहेत.
सोमवारच्या चार मोठया धक्क्यातून तुर्कस्तान-सीरिया सावरत नाही तोच मंगळवारी ५ रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप आले.रेड क्रिसेंट स्वयं सेवी संस्थेच्या म्हणण्यानुसार सीरियातील ढिगाऱ्यातून १८००० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत
पुढील ४८ तास खूप महत्वाचे
पुढील ४८ तास खूप महत्वाचे आहेत. यानंतर ढिगाऱ्यात गाडलेल्या गेलेले लोक जिवंत असण्याची शक्यता कमी होईल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील प्रादेशिक आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवुड यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांचा त्रिपुरात काँग्रेसवर हल्लाबोल
राहुल गांधी यांचा आटापीटा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी संबंध जोडण्याचा प्रयत्न
राहुल गांधी यांची संसदेत पोस्टरबाजी
२४ तासात ५ भूकंपाचे धक्के
तुर्क येथे पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी होती. यानंतर दुपारी ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गेल्या २४ तासांत तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे पाचवेळा धक्के बसले आहेत.
तुर्की १५० किमीच्या परिघात सरकला
सांगितले की, भूकंपामुळे तुर्की १५० किमीच्या परिघात तीन मीटर उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिमेकडे सरकले असल्याचे इटलीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स अँड व्होल्कॅनोलॉजीचे अध्यक्ष कार्लो डोग्लिओनी यांनी म्हटले आहे