26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू ; मुलगी सुखरूप

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू ; मुलगी सुखरूप

Google News Follow

Related

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत खुद्द रोनाल्डोने माहिती दिली आहे. त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जहिने एका मुलीचा जन्म झाल्याचे सांगितले आहे. या जोडप्याला जुळं होणार होते याची कल्पना त्यांनी आधी चाहत्यांना दिली होती. त्यानुसार एक मुलगा आणि मुलगी त्यांना झाली त्यातील नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामवरून याची माहिती दिली आहे. ख्रिस्तियानोने ही माहिती देताना दु:ख झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या नवजात बाळाचे निधन झाल्याचे सांगत याच्या ज्या आम्हाला वेदना झाल्या आहेत त्या फक्त इतर पालकांना कळतील असेही रोनाल्डोही म्हणाला आहे. पुढे तो म्हणाला, मात्र आमची मुलगी सुखरूप असल्याने आम्हला थोडा धीर आला आहे, असे म्हणत त्याने सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आभार मानले आहेत. रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी दोघांनी हॉस्पिटलमधील एक फोटोही शेअर केला आहे. या दोन मुलांच्या प्रसूतीवेळी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे.

हे ही वाचा:

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

ठाकरे सरकार हीच मोठी बनवेगिरी

‘कितीही तोडफोड केली तरी, आम्ही त्यांची पोलखोल करणारच’

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र निघाले ‘फेक’

मुलगा आमचा देवदूत होता, आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करू असे देखील रोनाल्डोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई- बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. रोनाल्डोला अकरा वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा