तुर्कीमध्ये तीव्र भूकंपाने हाहाकार, इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या

१५ जण ठार. मृतांचा आकडा वाढण्याची भीती

तुर्कीमध्ये तीव्र भूकंपाने हाहाकार, इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या

तुर्कीला भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. या
भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत किती जण दगावले याची नेमकी माहिती कळू शकलेली नाही. तरी भूकंपात आतापर्यंत ५ जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिष्टर स्केल वर भूकंपाची तीव्रता ७.८ एवढी नोंद झाली आहे.

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार आज पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी झाला. भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीच्या आत १७.९ किलोमीटर होता.

तुर्कस्तानच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार स्थानिक वेळेनुसार पहाटे ४:१७ वाजता दक्षिण तुर्कीमधील प्रमुख औद्योगिक शहर गॅझियानटेपच्या उत्तरेस एक तासाच्या अंतरावर असलेल्या पाझारसिक शहरात पहिला झटका जाणवला. दुसरा धक्का स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून २६ मिनिटांनी जाणवला. ज्याचा केंद्रबिंदू नूर्दगी पासून जवळपास २३ किलोमीटर नैऋत्येला होता.

तुर्कीच नाही तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे १६ इमारतींची पडझड झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पळत सुटले. सगळे नागरीक चौकात जमा झाले होते.
भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव पथके तातडीने पाठवण्यात आली आहेत. आम्हाला आशा आहे की आम्ही एकत्रितपणे या आपत्तीवर लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानासह मात करू असे
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Exit mobile version