पुतिन यांच्या पाठोपाठ या समर्थकावर प्राणघातक हल्ला, चालकाचा मृत्यू

पुतिन यांच्या पाठोपाठ या समर्थकावर प्राणघातक हल्ला, चालकाचा मृत्यू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर आता त्यांचा समर्थक असलेल्या कादंबरीकारावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या कार बॉम्बस्फोटात साहित्यिकाचा जीव वाचला असला तरी या हल्ल्यात त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. यापूर्वी पुतीन यांच्या क्रेमलिनच्या घरावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. रशियाने या हल्ल्याला युक्रेनकडून पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

सरकारचे समर्थक असलेले कादंबरीकार झाखर प्रिलेपिन याच्या कारचा स्फोट झाला, तो जखमी झाला आणि त्याचा ड्रायव्हर ठार झाला. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘तास’ ने आणीबाणी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, मॉस्कोपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या निझनी नोव्हगोरोड भागात झाखरच्या कारमधील स्फोट झाला. झाखर हे एक प्रसिद्ध राष्ट्रवादी लेखक आणि क्रेमलिनच्या युक्रेनमधील “विशेष लष्करी ऑपरेशन” चे कट्टर समर्थक आहेत.

हे ही वाचा:

खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून क्रेमलिन समर्थक मान्यवरांचा समावेश असलेला हा तिसरा स्फोट आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, . या स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियन वृत्तसंस्था आरबीसीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की प्रिलेपिन शनिवारी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क भागातून मॉस्कोला परतत होते आणि जेवणासाठी निझनी नोव्हगोरोड येथे थांबले होते. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या इरिना वोल्क यांनी सांगितले की, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version