ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर ‘पुष्पा’च्या भूमिकेत…

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर ‘पुष्पा’च्या भूमिकेत…

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘ पुष्पा: द राइज’ हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई होत असताना, सामान्य लोकांपासून ते मोठमोठे कलाकार, सेलिब्रेटी या चित्रपटावर रील्स तयार करत आहेत. याचा मोह ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज डेव्हिड वॉर्नरलासुद्धा झाला आहे. त्याने या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना सोशल मीडियावर एकामागून एक अनेक व्हिडिओ टाकले आहेत. आता तर त्याने अल्लुअर्जुन ने साकारलेल्या पुष्पाच्या भूमिकेचीच नक्कल करत चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पूर्णतः चित्रपटाचा मुख्य कलाकार अल्लू अर्जुनचा लुक कॉपी करून पुष्पा साकारला आहे. या व्हिडीओमध्ये तो अल्लू सारखाच नाचताना आणि भांडताना दिसत आहे.  चाहते यावर भरभरून कमेंट करत आहेत. ‘तुम्ही क्रिकेट सोडून भारतीय फिल्म इंडस्ट्रीत का येत नाही?’ असा प्रश्नच एका वापरकर्त्याने डेव्हिड ला केला आहे. तसेच ‘पुष्पा 2 मध्ये तुम्ही रोल करू शकता का?’, ‘ऑस्ट्रेलियन पुष्पा.’ अश्या अनेक प्रतिक्रिया त्याच्या व्हिडीओला आल्या आहेत.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

श्रीनगरच्या लालचौकात प्रथमच फडकला भारतीय तिरंगा

याआधी डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स केला होता. या डान्सचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा खुद्द अल्लू अर्जुन दोन्ही चिमुकल्यांच्या डान्सचा चाहता झाला.  डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी ‘पुष्पा: द राइज’ मधील ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुक स्टेपची कॉपी करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

डेव्हिड वॉर्नरला भारतीय चित्रपटांबद्दल विशेष आत्मीयता आहे. इन्स्टाग्रामवर तो अनेकदा बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांच्या गाण्यांचे मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो. डेव्हिड वॉर्नरने आपल्या मुलाखतींमध्ये म्हटले आहे की, आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादने त्याला भारतीय चित्रपट, विशेषत: तेलुगू चित्रपटांची ओळख करून दिली आहे.

Exit mobile version