‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट

‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट

क्रीडा आणि खेळाडूंवर अनेक चित्रपट व माहितीपट तयार करण्यात आले आहेत. आता अशीच आणखी एक डॉक्युमेंटरी येत आहे. हा चित्रपट गुन्हेगारी आणि कुस्तीसारख्या प्रतिष्ठित खेळावर आधारित आहे. ‘दंगल ऑफ क्राइम’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारची कथा दाखविण्यात आली आहे. नियंता शेखरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे .

हा चित्रपट कुस्ती आणि गुन्हेगारी जगतामधील दुवा शोधणारा आहे.

केवळ डिस्कव्हरी प्लस वर दाखवलेली ही माहितीपट मालिका दर्शकांना आणि चाहत्यांना भारतातील कुस्ती या ऑलिम्पिक खेळाच्या वाढीच्या प्रवासात घेऊन जाणार आहे.

माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक, प्रख्यात क्रीडा पत्रकार तसेच कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी त्यांच्या खेळाशी संबंधित अनुभव, अंतर्दृष्टी आणि आठवणींनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दंगल ऑफ क्राइम’ ही एक रोमांचक माहितीपट मालिका दोन भागांची आहे. ज्याचा उद्देश क्रीडा, गुन्हेगारी आणि इतिहास शैलीतील माहिती प्रेक्षकांना दाखवणे असा आहे.

या माहितीपट मालिकेत दोन अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे. ज्यातून एकीकडे कुस्ती या खेळाने भारताच्या खेळाला सन्मान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावली आहे, हे दिसून येते. खेळाच्या गौरवशाली प्रवासावर आणि खेळाडूंच्या अभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कारनाम्यांचाही हा माहितीपट साक्षीदार ठरला आहे.

व्हाइस स्टुडिओ प्रॉडक्शन निर्मित आणि पुरस्कार विजेते दिग्दर्शक नियंता शेखर यांनी दिग्दर्शित केलेला हा माहितीपट कुस्तीपटूंचा यशस्वी प्रवास दर्शवतो आणि आखाडा संस्कृती, कडक शिस्त आणि अतुलनीय निष्ठा यासारख्या यशस्वी कुस्तीपटू बनण्याच्या अनेक आवश्यक पैलूंवर प्रकाश टाकतो.

हे ही वाचा:

मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

नथुरामवरील चित्रपटाचे भवितव्य

कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?

चेन्नईचा रहिवासी असलेल्या शेखरसाठी हे काम सोपे नव्हते. त्याच्यासाठी हा वेगळा मार्ग होता आणि त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. शेखर म्हणाला की, मातीपासून सुरू झालेला प्रवास मॅटपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर कुस्ती हा एक खेळ म्हणून उदयास आला ज्याने ऑलिम्पिकमध्ये भारताची शान उंचावली आहे.

या माहितीपटाबद्दल TV9 भारतवर्षशी बोलताना शेखर म्हणाला, “या माहितीपट मालिकेत कुस्ती जग आणि गुन्हेगारी यांच्यात काय संबंध आहेत, काय संबंध आहेत आणि त्यामागील कारण काय आहे, याचा शोध आम्ही या माहितीपटात घेत आहोत. याशिवाय, आम्ही कुस्तीकडे ऐतिहासिक परिस्थिती म्हणून पाहत आहोत.

Exit mobile version