‘साँड की आँख’च्या शूटर दादी चंद्रो करोनामुळे मृत्युमुखी

‘साँड की आँख’च्या शूटर दादी चंद्रो करोनामुळे मृत्युमुखी

वयाच्या ६०व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात करून एक वेगळाच आदर्श निर्माण करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध नेमबाज चंद्रो तोमर यांचे करोनामुळे निधन झाले. दादी शूटर म्हणून त्या ओळखल्या जात. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यासोबत वयोवृद्ध नेमबाज म्हणून ज्यांची ओळख होती, त्या त्यांच्या जाऊबाई प्रकाशी तोमर यांनी चंद्रो यांची साथ सुटल्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर माझी सोबत सुटली, चंद्रो कुठे निघून गेली, अशा शब्दांत टाहो फोडला आहे.
श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर चंद्रो तोमर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणी केल्यावर त्यांना करोना असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा:

जिहादी उस्मानीने पुन्हा ओकली गरळ

लागोपाठ दोन शरीरसौष्ठवपटू करोनाने गेले!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

उत्तर प्रदेशच्या बागपत गावातील चंद्रो यांनी वयाच्या ६०व्या वर्षी पहिल्यांदा बंदुक हातात धरली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठांच्या स्पर्धेत अनेक पदके जिंकली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेणारा ‘साँड की आँख’ हा चित्रपट झळकला. भूमी पेडणेकरने चंद्रो यांची भूमिका त्यात केली होती. तर त्यांच्या जावेची म्हणजेच प्रकाशीची भूमिका तापसी पन्नूने केली होती.
भूमी पेडणेकरनेही चंद्रो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून माझा एक हिस्साच आज निघून गेल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. पण त्यांचा ठसा आपल्यावर कायम राहील, असेही ती म्हणते.
भारताचा बॉक्सर अखिल कुमारने म्हटले आहे की, हा करोना आहे आणखी काही. मला तर शंकाच येऊ लागली आहे. आणखी एक वाईट बातमी आली आहे. दादी चंद्रो तोमर यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.

Exit mobile version