डी.वाय. चंद्रचूड होणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश

सेवा जेष्ठतेनुसार हे होणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश

डी.वाय. चंद्रचूड होणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश

भारताचे विद्यमान ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांना २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महामाहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती ललित यांना शपथ दिली होती. दरम्यान उदय लळित यांचा ७४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्यामध्ये आता पर्यंत पाच हजार प्रकरणे निकाली काढली आहेत, तसेच जुने खटले तत्काळ मार्गी लागावे म्हणून लळित यांनी ‘लिस्टिंग सिस्टम’ ही पद्धत ही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान उदय लळित ८ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश या पदावरून निवृत्त होत आहेत.

याच दरम्यान नियमाप्रमाणे केंद्र सरकारने उदय लळित यांच्याकडे उत्तरधिकाराऱ्यांची नावे मागिवली होती. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात डी. वाय. चंद्रचूड हे जेष्ठ न्यायमूर्ती आहेत त्यामुळे डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची ५० व्या सरन्यायाधीश या पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर २०२४ पर्यत म्हणजेच एकूण दोन वर्षाचा कालावधी असणार आहे.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

भारताचे ५० वे आगामी सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर ११५९ मध्ये झाला असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते नोव्हेंबर २०२२ मध्ये भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार असून ते सर्वाधिक काळ काम करणारे सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

Exit mobile version