24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियासितरंग चक्रीवादळाचा कहर, बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू

सितरंग चक्रीवादळाचा कहर, बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू

भारतातील ७ राज्ये हाय अलर्टवर

Google News Follow

Related

सितरंग चक्रीवादळाने बांगलादेशात कहर केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळाने २४ ऑक्टोबर रोजी येथील किनारपट्टीवर धडक दिल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून हजारो लोकांना समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातून हलवण्यात आले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. सितरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने बांगलादेशमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगाल आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सितरंग चक्रीवादळ बंगालमध्ये धडकण्यापूर्वी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोलकात्यासह दक्षिण बंगालमध्ये हवामान बदलले. सकाळपासून पाऊस पडत आहे. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ सध्या सागर बेटापासून ३८० किमी अंतरावर आहे. तर सितरंग बांगलादेशपासून ५८० किमी दूर आहे. २५ ऑक्टोबरला सकाळी बारिसालजवळील संद्वीपच्या पश्चिमेला बांगलादेशचा किनारा ओलांडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

स्थानिक मीडियानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बरगुना, नरेल, सिराजगंज जिल्हे आणि भोला या बेट जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले. कॉक्स बाजार किनाऱ्यावरून हजारो लोक आणि पशुधन बाहेर काढण्यात आले.

ढाका ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, कॉक्स बाजार समुद्रकिनाऱ्यावरून किमान २८,१५५ नागरिक आणि २,७३६ गुरांची सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे, त्याच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा