रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या युद्धाचे सावट संपूर्ण जगावर घोंगावत होते. ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. या युद्धाचे गंभीर परिणाम होताना दिसत असून याच्या झळा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वधारल्या आहेत. तर सोन्याचा भावही वाढताना दिसत आहे.
गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतींनी शंभर डॉलर्सचा एकदा पार केला आहे. १०४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन देशातला तणाव वाढत जात असतानाच सोबतीला कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढत जात होत्या. त्यातच गुरुवार, २४ फेब्रुवारी रोजी जेव्हा युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा हे भाव शंभर डॉलरच्या पार जाताना दिसले.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
‘नवाब मलिकांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये’
रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…
भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल…
यापूर्वी २०१४ साली कच्च्या तेलाचे भाव हे शंभर डॉलर पर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हादेखील रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाची स्थिती होती. रशियाने युक्रेनच्या भागात कब्जा करायला सुरुवात केली होती आणि त्याचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर झालेला पाहायला मिळाला होता. रशिया हा कच्च्या तेलाचा जगातील तिसरा मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. त्यामुळे हा परिणाम बघायला मिळत आहे.
दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे युद्ध आणखीन ताणले न जाता शांत व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पण रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्धावर ठाम असून अमेरिका आणि युरोपमधले काही देश युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरताना दिसतील.