परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन राष्ट्रांमधील मैत्री कमी झाली असेल किंवा ते चांगले शेजारी राहिले नसतील तर आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामाबादमध्ये एससीओ कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या २३ व्या बैठकीत आपल्या भाषणात जयशंकर म्हणाले, “जर विश्वासाची कमतरता असेल किंवा सहकार्य अपुरे असेल, जर मैत्री कमी झाली असेल आणि चांगला शेजारीपणा कुठेतरी हरवला असेल, तर आत्मपरीक्षण करण्याची निश्चितच गरज आहे.”
एस जयशंकर यांनी सीमेपलीकडील दहशतवाद, दहशतवादी आणि फुटीरतावाद यांना ‘तीन वाईट’ म्हणत हे देशांमधील व्यापार आणि लोकांच्या संबंधांमध्ये अडथळा आणतात, असं मत मांडले आहे. सीमेपलीकडे दहशतवाद, दहशतवादी आणि फुटीरतावाद या कारवाया सातत्याने होत असतील तर समांतर व्यापार, ऊर्जा प्रवाह, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील देवाणघेवाण यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
आपल्या सर्वांना हे समजले आहे की जग बहु-ध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. जागतिकीकरण आणि पुनर्संतुलन हे वास्तव आहे जे नाकारता येत नाही. एकत्रितपणे, त्यांनी व्यापार, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा प्रवाह आणि इतर प्रकारच्या सहकार्याच्या बाबतीत अनेक नवीन संधी निर्माण केल्या आहेत. जर आपण हे पुढे नेले तर आपल्या क्षेत्राला खूप फायदा होईल यात काही शंका नाही, असे एसजयशंकर म्हणाले. देशांमधील सहकार्य हे परस्पर आदर आणि सार्वभौम समानतेवर आधारित असले पाहिजे. ते एकतर्फी अजेंडा नसून, खऱ्या भागीदारीवर बांधले गेले पाहिजे.
हे ही वाचा :
एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन
विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल
प्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!
लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू
एस जयशंकर हे मंगळवारी एससीओ कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या २३ व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानमध्ये गेले आहेत. दोन दिवसीय एससीओ बैठकीचे अध्यक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.